जगदंबादेवीचे पुजारी रतनसिंह राठोड यांचे दातृत्व !

अक्कलकोट – समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत तोळणूर येथील जगदंबादेवीचे पुजारी रतनसिंह राठोड यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने २५ गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश फुलवला आहे.
अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे अनेक शेतकरी आणि कामगारवर्ग संकटात असतांना, राठोड यांनी स्वतःच्या मर्यादित उत्पन्नातून हा सामाजिक उपक्रम राबवला. ‘मी गरीब कुटुंबात जन्मलो आहे. माझ्यापेक्षाही अनेक कुटुंबे अत्यंत गरिबीत जीवन जगतात. त्यांच्या झोपडीतही दिवाळीचा दिवा लागावा, या भावनेतून मी हा उपक्रम हाती घेतला’, असे राठोड यांनी सांगितले.

तोळणूर, जेऊरवाडी आणि अक्कलकोट स्थानक परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबांना साखर, तेल, रवा, डाळी, हरभरा, फुटाणे, खोबरे आदी वस्तूंचे ७ किलो एवढे दिवाळी कीट देण्यात आले. या उपक्रमात श्रीमंत राठोड, संदीप राठोड, संतोष राठोड, काशीनाथ राठोड, नामदेव राठोड, अक्षय राठोड, सुभाष चव्हाण आदी मान्यवर सहभागी झाले होते.
गरिबीशी झुंज देत स्वतः श्रम करून उपजीविका करणार्या राठोड यांनी दाखवलेल्या या दातृत्वाचे समाजात कौतुक होत आहे. अशा पुजार्यांमुळे देवळाचेच नव्हे, तर सामाजिक सेवेचे पावित्र्य वृद्धींगत झाले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे आणि हिंदु साधू-संत, समाज दातृत्वात कधीही मागे रहात नाहीत ! |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !