
मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – ९५० वर्षे पुरातन असलेल्या आणि भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिराला तडे गेले आहेत.
🚨 SHOCKING NEGLECT
India's Ancient Heritage at Risk 🚨
The nearly 1000-year-old Ambernath Shiv Mandir in Thane, a protected monument by the @ASIGoI, is crumbling
Cracks have appeared in the structure, and exquisite sculptures of deities like Bhagwan Vishnu & Ganesha are… pic.twitter.com/e9mYvraxyZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 21, 2025
अनेक ठिकाणी मंदिराचे अवशेष तुटले आहेत, मंदिरावरील अनेक शिल्पे भग्न झाली आहेत. इतकी दुरवस्था होऊनही भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराच्या संवर्धनासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. हे मंदिर देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत केलेल्या अर्जावरून अंबरनाथ मंदिराच्या संवर्धनासाठी किंवा डागडुजीसाठी पुरातत्व विभागाकडून कोणत्याही प्रकारे सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुंबईच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


अशी आहे मंदिराची दुरवस्था !
या मंदिरावर भगवान श्रीविष्णु, गणपति, नृसिंह या देवतांसह अन्य देवतागण नृत्य करतांनाची शिल्पे आहेत. यांतील बहुतांश शिल्पे तुटलेली आहेत. काही शिल्पांची शिरे तुटली आहेत, तर काहीचे अवयव तुटले आहेत.

अनेक ठिकाणी मंदिराचे काही भाग तुटले आहेत. मागील अनेक वर्षे या मंदिराच्या संवर्धनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सद्यःस्थितीत या मंदिराची स्थिती अत्यंक बिकट झाली आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !