४ जणांना अटक

मुंबई, २० ऑक्टोबर (पसूका) – दीपावलीपूर्वी फटाक्यांची अवैध आयात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सक्रीय कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ या मोहिमेच्या अंतर्गत तुतीकोरिन बंदरात ४० फूट लांबीचे २ कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये ८३ सहस्र ५२० चिनी फटाके असल्याचे आढळून आले. या कंटेनरमध्ये अभियांत्रिकी वस्तू असल्याचे घोषित केले गेले होते; पण प्रत्यक्षात त्यात फटाके होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ५ कोटी १ लाख रुपये इतकी असून हा माल ‘सिलिकॉन सीलंट गन’च्या ‘कव्हर कार्गो’सह (वेष्टनासह) जप्त करण्यात आला.
Operation Fire Trail: Illegally smuggled Chinese firecrackers worth approximately ₹5 crores seized at the Tuticorin port by Directorate of Revenue Intelligence (DRI) on eve of #Diwali
• 4 people arrested
The import of firecrackers is restricted. pic.twitter.com/K4aLoJKkdY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 20, 2025
ही एकूण कारवाई १४ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी तुतीकोरिन येथे आयातदाराला अटक केली. पुढील अन्वेषणानंतर चेन्नई आणि तुतीकोरिन येथून आणखी ३ व्यक्तींना (मुंबईतील २ व्यक्तींसह) अटक करण्यात आली आहे. सर्व ४ आरोपींना या तस्करीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
फटाक्यांची आयात ही परराष्ट्र व्यापार धोरणातील भारतीय व्यापार वर्गीकरण (एच्एस् – हार्माेनिक सिस्टम (ही एक मानक प्रणाली आहे)) यांनुसार प्रतिबंधित असून यासाठी ‘विदेश व्यापार महासंचालनालय आणि पेट्रोलियम अन् विस्फोटक सुरक्षा संघटन’ यांच्याकडून ‘स्फोटक नियम, २००८’ अंतर्गत परवाना घेणे आवश्यक आहे. अशी बेकायदेशीर आयात आणि चुकीची घोषणा ही केवळ परराष्ट्र व्यापार अन् सुरक्षा कायदा यांचे उल्लंघन नाही, तर फटाक्यांच्या अत्यंत ज्वलनशील स्वरूपामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि बंदराच्या पायाभूत सुविधा यांना गंभीर धोका निर्माण करते.
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा