देववाणी संस्कृतचे अद्वितीयत्व !

१. केवळ संस्कृत भाषेत तीन वचने आणि तीन लिंग असणे
‘सुसंस्कार जिच्यापासून मिळतात, ती आहे वैदिक भाषा संस्कृत ! या भाषेला ‘देवभाषा’ असेही म्हटले गेले आहे. तिच्यात मोठी विलक्षणता आहे. या भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे. इतर भाषांमध्ये एकवचन आणि बहुवचन ही २ वचने असतात; परंतु संस्कृतमध्ये ३ वचने आहेत. इतर पुष्कळ भाषांमध्ये ३ लिंग नसतात; मात्र या भाषेत तीन ३ आहेत.
२. जीवात्म्याला परमात्म्याच्या भेटीची व्यवस्था करवून देणारी अद्वितीय संस्कृत भाषा !
संस्कृत भाषा ही जगाची प्राचीन देणगी आहे. हा ठेवा प्राचीन असूनही नित्य, नूतन आहे. भारतातील सर्व भाषा संस्कृतमधूनच जीवनरस मिळवतात. धार्मिक जीवन, सुसंस्कृत जीवन, विकारांच्या विकृतीपासून वाचून समाधीस्थ आणि प्रकृतीस्थ जीवन, तसेच प्रारब्धाहून पुढे पोचवून जीवात्म्याला परमात्म्याच्या भेटीची व्यवस्था करवून देते, ती संस्कृत भाषा आणि आपली संस्कृती !
३. मनाला अंतर्मुख करणारे संस्कृत !
संस्कृत सर्व भाषांची माता आहे. संस्कृतचा अर्थ जो जाणतो, त्याला संस्कृतचा आनंद मिळतो. संस्कृतचे उच्चारण केल्यास काही वेळातच वातावरणात शांती, प्रेम आणि एकत्वाचे तरंग निर्माण होतात. उच्च कोटीचे आचार्य आणि मोठमोठे विदेशी विद्वान यांनीही म्हटले आहे, ‘तुम्ही जेव्हा इंग्रजी भाषा बोलता, तेव्हा मन बहिर्मुख होते आणि संस्कृत उच्चारता, तेव्हा मन अंतर्मुख होते; कारण संस्कृत अंतरातून निघते.’
४. संस्कृत ही मूळ भाषा आहे. सर्व भाषांचे सार संस्कृत आहे. जे संस्कृत जाणतात, त्यांना संस्कृतचा निराळा आनंद मिळतो.
५. संतांच्या संतत्वाचे मूळ संस्कृत असणे
आत्म्याची अनुभूती देणारी जी भाषा आहे, ती संस्कृत आहे. जे शास्त्र बनले आहे, ते संस्कृतमध्येच आहे. चीनची भिंत प्रसिद्ध आहे, कुवैतचे पेट्रोलियम प्रसिद्ध आहे, भारतातील संत प्रसिद्ध आहेत आणि संतांच्या संतत्वाचे मूळ आहे, ते संस्कृत भाषेचे सत्साहित्य, वैदिक ज्ञान !’
(साभार : मासिक ‘ऋषिप्रसाद’, ऑगस्ट २०१५)
संपादकीय भूमिकाजेव्हा आपण इंग्रजी भाषेत बोलतो, तेव्हा मन बहिर्मुख आणि संस्कृत भाषेत बोलतो, तेव्हा मन अंतर्मुख होते, हे जाणा ! |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?