|
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील बीएमटीसी’च्या (बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पाेरशन – बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळच्या) बसच्या काचेवर, आतील भागात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे ‘स्टिकर्स’ अवैधरित्या लावले आहेत.
🚨 Use of BMTC Bus for Christian Propaganda! 🚌✝️
After objection by @Mohan_HJS, spokesperson of @HinduJagrutiOrg, BMTC swiftly removed the illegal propaganda stickers 🚫
Shameful that anyone can stick such posters on govt buses unchecked; action comes only after public… pic.twitter.com/XOGOyV0JXo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 14, 2025
यातील एका बसचे छायाचित्र काढून ‘एक्स’वर पोस्ट करून विरोध करण्यात आल्यावर महामंडळाने ते काढून टाकले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
Stickers that were pasted on buses without our prior information have been removed immediately. pic.twitter.com/ELFRPwDd8y
— BMTC (@BMTC_BENGALURU) October 14, 2025
श्री. मोहन गौडा पुढे म्हणाले की,

१. सध्या बेंगळुरूमध्ये ख्रिस्ती धर्माचा जोरदार प्रचार चालू आहे आणि या प्रचारामुळे हिंदूंविरुद्ध अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे.
२. मी याविषयी बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळाला (‘बीएमटीसी’ला) ‘एक्स’वरून प्रश्न विचारल्यावर ‘बीएमटीसी’ने उत्तर दिले की, ‘आमच्या अनुमतीविना स्टिकर्स लावण्यात आले होते, ते तात्काळ काढून टाकण्यात आले आहेत.’
३. हे सूत्र येथेच सोडून न देता ‘हे स्टिकर्स कोण वापरत होते ?’ याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
४. हा केवळ एका बसचा प्रश्न नाही, तर इतर राज्यांमध्ये, सरकारी वाहनांमध्ये, सरकारी सुविधांमध्ये आणि सरकारी ठिकाणी अशा प्रकारे ख्रिस्ती धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयानेही काही ठिकाणी बांधलेले अवैध चर्च हटवण्याचे निर्देश दिले होते.
५. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही धर्मप्रचाराच्या नावाखाली अवैधरित्या काम करणार्या अशा ख्रिस्ती मिशनरींवर कटाक्षाने लक्ष द्यावे. अशा घटना समोर आल्यास कायदेशीर कारवाई करावी.
संपादकीय भूमिकामहामंडळाच्या बसगाड्यांवर कुणीही विनाअनुमती स्टिकर्स लावतो आणि महामंडळ त्याविषयी अनभिज्ञ असते, तसेच अन्य कुणी सांगितल्यावर महामंडळ कारवाई करते, हे महामंडळातील प्रशासकीय अधिकार्यांना लज्जास्पदच ! |

Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !