प्रादेशिक परिवहन अधिकार्यांची चेतावणी !

पुणे : दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारू नयेत. राज्य महामंडळाच्या तिकिटापेक्षा दीडपट तिकीट घेण्यास अनुमती आहे; पण त्यापेक्षा अधिक घेतल्यास अशा बसचालकांवर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी खासगी बसचालकांच्या बैठकीत दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालयात या विषयीच्या तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.
‘रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर करू नका. मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन धोकादायक पद्धतीने उभे करू नका, वाहनांची सर्व वैध कागदपत्रे जवळ बाळगा’ अशा सूचना त्यांनी केल्या.
‘जादा भाडे आकारल्यास नागरिकांनी ८२७५३३०१०१ या क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेलवर तक्रार करावी. नागरिकांनी तक्रार करतांना स्वतःचे नाव, भ्रमणभाष क्रमांक, तिकिटाचे छायाचित्र अशी माहिती पाठवावी’, असे आवाहन कार्यालयाने केले आहे.
सुराज्य अभियानाकडून पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निवेदन

पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांना हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून भाडेवाढीच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. सुराज्य अभियानाकडून राज्यभरात अनेक ठिकाणी प्रशासनाला अशा प्रकारची निवेदने आतापर्यंत देण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाबसचालक उघडपणे प्रचंड प्रमाणात भाडे आकारत असल्याने त्यांचा परवाना रहित करून कारागृहात डांबण्याची कारवाई केली पाहिजे ! |
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच