हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणार्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाच्या प्रदर्शनला विरोध

चिपळूण, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘मनाचे श्लोक’ नावाचा मराठी चित्रपट १० ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होत आहे. राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने करमणूक करण्यासाठी मराठी चित्रपट निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. कोट्यवधी समर्थभक्त आणि श्रद्धेय हिंदूंच्या धार्मिक भावना यांमुळे दुखावल्या असून सामाजिक अन् धार्मिक तणाव या चित्रपटामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय न्याय संहिता कलम २९९ नुसार हेतूपुरस्सर आणि द्वेषपूर्ण उद्देशाने धार्मिक भावना दुखावणे, हा गंभीर गुन्हा असून या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठांनी केली. हे निवेदन दिल्यानंतर ‘आम्ही आजच वरिष्ठ अधिकार्यांकडे चर्चा करून तुम्हाला कळवतो’, असे आश्वासन या वेळी पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी दिले.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनाही हे निवेदन देण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्याशी चर्चा करतांना, या आधी ‘पीके’ यांसारखे अनेक चित्रपट आणि अलीकडेच ‘खालीद का शिवाजी’ आणि आता ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटांच्या माध्यमातून बहुसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्याचा प्रकार वारंवार होत असून यातून समाजात प्रक्षोभक वातावरण निर्माण केले जात आहे. याला चित्रपट प्रमाणपत्र देणारी ‘सेन्सॉर बोर्ड’ ही शासनयंत्रणा उत्तरदायी आहे. याविषयी एक अहवाल प्रशासन आणि पोलीसयंत्रणेकडून शासनाकडे पाठवण्यात यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या मागणीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी होकार दर्शवला आहे. ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे नाव न पालटल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही या वेळी सांगण्यात आले.
हे निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अमित जोशी, गोरक्षक विक्रम जोशी, शिवसेनेचे प्रशांत उतेकर, विहिंपचे पराग ओक, सकल गुरव समाज संघटनेचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष उमेश गुरव, हिंदुत्वनिष्ठ राजेश ओतारी, केतन ढवळीकर, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके, सनातन संस्थेचे श्री. केशव अष्टेकर, सौ. कविता अष्टेकर, महेश कात्रे, आणि प्रल्हाद बांदेकर उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाहिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांचे आश्वासन |
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani