
उळे (जि. सोलापूर) – नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी जाणार्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या पार्श्वभूमीवर हिंदु समाजाच्या विविध स्तरांमध्ये धर्मभावना जागृत होत असून, हिंदु भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा महाराष्ट्रात तातडीने लागू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ? – संपादक)
या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उळे (जि. सोलापूर) येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्रामस्थ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील भाविक आणि तरुणवर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून भाविकांनी मोठ्या संख्येत स्वाक्षरी करून या मागणीला समर्थन दिले.

हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदीप ढगे, धनंजय बोकडे, लिंगराज हुळ्ळे, तसेच कु. श्रद्धा सगर, कु. श्रीविद्या पोगुल यांनी या प्रसंगी उपस्थित भाविकांना ‘लव्ह जिहाद’विषयी जागरूक केले, तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगून आणि ‘मैं हु दुर्गा’ या अभियानाचे फलक हातात घेऊन हिंदु समाजात जागृती केली.
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !