चित्रपटाचे नाव त्वरित न पालटण्यास जनआंदोलनाची चेतावणी

सातारा, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचा संक्षिप्त भाग दाखवणारे विज्ञापन) नुकताच प्रदर्शित झाला असून १० ऑक्टोबरला तो प्रदर्शित होणार आहे. ‘ट्रेलर’वरून हा चित्रपट एका तरुणाचा विवाह जुळवण्याच्या कथेवर आधारित असल्याचे दिसून येते. या चित्रपटातील नायकाचे नाव श्लोक असून त्याच्या मनातील विवाहाविषयी विचारांचे प्रतिबिंब म्हणून या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’, असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाला ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाचे नाव देण्यात आल्यामुळे श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आणि समस्त समर्थभक्त यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. श्री समर्थ सेवा मंडळ आणि समर्थभक्त यांनी या चित्रपटाचे नाव पालटण्याची मागणी केली असून नाव न पालटण्यास जनआंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. याविषयी मंडळाकडून जाहीर निवेदन लेखक-दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे, निर्माते श्रेयश जाधव, संजय दावरा, स्टारलाईट बॉक्स थिएटर्स, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अर्थात् सेन्सॉर बोर्ड यांच्या नावे दिले आहे. श्री समर्थ सेवा मंडळाचे श्री. प्रवीण मुकुंद कुलकर्णी आणि अधिवक्त्या सौ. मुग्धा महेश बिवलकर यांनी हे निवेदन दिले आहे.
“Hero’s marriage thoughts shown as ‘Manache Shlok’” – Hindus slam Marathi film ‘Manache Shlok’, demand name change ✊🏻
Trailer promotes immoral relationships, with dialogues like:
💬 “I oppose only marriage, not falling in love”
💬 “You are deeply in love with my wife”All this… pic.twitter.com/TK63yfFCPt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 5, 2025
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
१. ‘मनाचे श्लोक’ हे ग्रंथाचे नाव आहे, त्यालाच ‘मनोपनिषद’ असेही म्हणतात. जवळजवळ ३५० वर्षांपासून जागतिक स्तरावर सातत्याने या श्लोकांचा अभ्यास, पठण आणि प्रचार अत्यंत श्रद्धेने केला जात आहे. हा प्राचीन ग्रंथ शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी असून समस्त भारतियांचा आदर अन् श्रद्धा यांचे प्रतीक आहे.
२. चित्रपटात जर या नावाचा वापर मनोरंजनाच्या अथवा काही काल्पनिक कथानकासाठी होत असेल, तसेच त्या कथेत संतपरंपरेशी विसंगत, अश्लील अथवा विकृत दृश्ये, संवाद किंवा सादरीकरण असेल, तर तो सरळसरळ राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामींचे कार्य अन् संत परंपरा यांचा अवमान ठरील.
३. ‘ट्रेलर’मध्ये ‘दास’ हा शब्द वापरून मनाचे श्लोकच आहेत, असा एक आभास प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्याचा अत्यंत विकृत प्रयत्न केलेला दिसत आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
४. हे नाव पालटले नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. यामध्ये समाजातील भाविक, विविध धर्मप्रेमी संघटना आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. अत्यंत योग्य पद्धतीने त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल. जनआंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचा निषेध नोंदवू .
संपादकीय भूमिकाअश्लील संवाद असलेल्या चित्रपटाला पवित्र ग्रंथाचे दिलेले नाव पालटण्याची मागणी का करावी लागते ? त्यासाठी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस-प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? हिंदू सहिष्णु आहेत; म्हणून त्यांच्या धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे का ? |
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !
आंध्रप्रदेश : समाजकंटकाने शिवलिंगाच्या समोरील दीपाने सिगारेट पेटवली !
गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर ६ महिन्यानंतर समितीची स्थापना