नंदुरबार येथे हिंदुत्ववादी संघटनांची गृहखात्याकडे मागणी

नंदुरबार – राकेश मारिया या निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या गुन्हेगारी कृत्यांची चौकशी करा, अशी मागणी नंदुरबारमधील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी येथे केली. याविषयीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री यांना दिले.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. मयूर चौधरी, श्री. सुमित परदेशी, जयेश भोई, भूषण पाटील, चेतन गवळी, कु. अश्लेषा पवार, भावना कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल मराठे हे उपस्थित होते. या निवेदनावर १५० हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.
१. महाराष्ट्र राज्याच्या गृहखात्याची प्रतिमा देशभरात कलंकित करणारे अंटालिया स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण, या दोन्ही प्रकरणांत राकेश मारिया यांचे निकटवर्तीय सुनील माने यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. मालेगाव प्रकरणातील निकालपत्रात न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे ओढले, ज्यात सुनील माने सहभागी होते. वर्ष २००६ मधील मुंबई लोकल बाँबस्फोट प्रकरणात अमानुष छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
🚨 Nandurbar Demands Probe Against Ex-Mumbai Police Commissioner Rakesh Maria
📢 Hindu groups submitted a memorandum to the CM & Home Minister through the District Collector with ✍️ 150+ signatures demanding investigation into his criminal acts:
1️⃣ Antilia Explosives & Mansukh… pic.twitter.com/z64S579ui0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2025
२. ‘दाभोलकर हत्या प्रकरणात राकेश मारिया यांनी आम्हाला खोटा जबाब देण्यासाठी २५ लाख रुपये देऊ केले होते’, असा गंभीर आरोप त्या वेळी प्रथम अटक करण्यात आलेले नागोरी आणि खंडेलवाल यांनी केला होता. यासह ‘मुंबई आतंकवादविरोधी पथकाने बनावट ‘फॉरेन्सिक’ अहवाल मिळवला’, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले होते. ‘या प्रकरणात सुनील माने अनधिकृतरित्या अन्वेषणात सहभागी होते आणि निरपराध्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत होते’, असा पुरावाही न्यायालयापुढे आला आहे.
३. नाशिक येथे एका कार्यकर्त्याकडे पिस्तुल सापडल्याचा दावा वर्ष २००९ मध्ये राकेश मारिया आणि सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पुढे आरोपपत्रात या दोघांचा उल्लेखच नसल्याने पोलिसांनी निरपराध व्यक्तीला कह्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक