परिपूर्ण सेवा करणारा अन् संतांप्रती भाव असलेला खोपोली (जिल्हा रायगड) येथील कु. भावार्थ जनार्दन जाधव (वय १४ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

खोपोली (जिल्हा रायगड) – येथील कु. भावार्थ जनार्दन जाधव (वय १४ वर्षे) याच्या वाढदिवसाच्या दिवशी (२९.९.२०२५ या दिवशी) त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सनातनच्या साधिका सौ. अमृता विक्रम जुनघरे यांनी कु. भावार्थ याला श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्याचा सत्कार केला.

कु. भावार्थ जाधव याला श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देतांना सौ. अमृता जुनघरे

या भावसोहळ्याच्या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. कु. भावार्थचे आई, वडील आणि बहीण, तसेच सनातनचे साधक या वेळी उपस्थित होते. कु. भावार्थची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर सर्वांची भावजागृती झाली. सर्वांचा श्री गुरूंप्रती कृतज्ञता भाव दाटून आला. या वेळी कु. भावार्थची गुणवैशिष्ट्ये उपस्थित साधक आणि कुटुंबीय यांनी सांगितली.

सद्गुरु अनुराधा वाडेकर
पू. (सौ.) संगीता जाधव

सद्गुरु अनुराधा वाडेकर या वेळी म्हणाल्या, ‘‘भावार्थने अनेक शारीरिक त्रासांवर मात करून हा टप्पा गाठला आहे. तो वयाने लहान असला, तरी त्याच्या आध्यात्मिक पातळीचा लाभ सर्व कुटुंबियांना होणार आहे. साधनेच्या संदर्भात त्याचा लाभ सर्व कुटुंबीय आणि साधक यांनी करून घ्यायला हवा. हिंदु राष्ट्रात कार्य करण्यासाठी त्याचा जन्म झाला आहे.’’

कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत !

१. सौ. प्रिया जाधव आणि श्री. जनार्दन जाधव (कु. भावार्थ याचे आई-वडील), खोपोली, रायगड. 

सौ. प्रिया जाधव

१ अ. गुरुदेवांच्या कृपेने आमच्या कुटुंबात भावार्थसारखा सात्त्विक मुलगा जन्माला आला ! : ‘आमच्या कुटुंबियांना आध्यात्मिक त्रास असतांनाही गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने आमच्या कुटुंबात भावार्थसारखा सात्त्विक मुलगा जन्माला आला’, त्याबद्दल आम्ही गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हीही भावार्थप्रमाणे साधनेचे प्रयत्न करून साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्याचा प्रयत्न करू.’

२. श्रीमती जयश्री जाधव (कु. भावार्थची आजी (वय ७० वर्षे), वडिलांची आई), खोपोली 

अ. ‘भावार्थने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे छान झाले. असा नातू आमच्या कुटुंबात जन्माला आला, याचा आम्हाला आनंद आहे.’

३. श्रीमती सुनीता पाटील (कु. भावार्थची आजी (वय ६५ वर्षे), आईची आई), खोपोली 

३ अ. प्रेमभाव : ‘मी मुलीच्या घरी आल्यावर भावार्थ मला पायांना मालिश करायचे यंत्र आणून देतो.’

४. श्री. प्रवीण जाधव (कु. भावार्थचे काका), खोपोली

श्री. जनार्दन जाधव

अ. ‘कु. भावार्थकडून ‘साधनेत प्रगती कशी करायची ?’, हे शिकण्याची संधी गुरुदेवांनी आम्हाला दिली आहे. ‘आमच्या कुटुंबामध्ये असा सात्त्विक जीव देवाने दिला आहे, म्हणजे जणू काही आम्हा सर्वांचा उद्धार करण्यासाठी आमच्या घरात पवित्र गंगा अवतरली आहे’, असे मला वाटते.’

५. सौ. शालिनी जाधव (कु. भावार्थची काकू), खोपोली

अ. ‘भावार्थ म्हणजे आमच्या कुटुंबासाठी सुरक्षाकवच आहे. ‘असा मुलगा आमच्या कुटुंबामध्ये आहे’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

६. सौ. कांचन आगिवले (कु. भावार्थची आत्या), खोपोली 

अ. ‘भावार्थ आमच्या कुटुंबात जन्माला आला’, हे आमचे पुष्कळ भाग्य आहे.

आ. तो पुष्कळ प्रेमळ आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांसाठी दिनांक : ३०.९.२०२५)

साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

१. श्री. किशोर पडवळ, खोपोली

अ. ‘कु. भावार्थ वयाने लहान असूनही सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागतो.

आ. तो साधकांशी नेहमी साधनेविषयीच बोलतो.

इ. ‘एवढ्या लहान वयात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला जीव आमच्या परिसरात रहात आहे’, त्याबद्दल आम्हाला कृतज्ञता वाटते.’

२. श्री. केतन शेंडे, खोपोली

अ. ‘कु. भावार्थ आमच्या घरी आल्यावर त्याचे लक्ष खाणे आणि खेळणे, यांकडे कधीच नसते.

आ. उन्नत साधक घरी आल्यावर जशी स्पंदने जाणवतात, तशीच स्पंदने आम्हाला भावार्थ घरी आल्यावर जाणवतात.

इ. भावार्थला लहान वयात साधनेचा योग्य मार्ग मिळाला. त्यामुळे त्याची साधनेत प्रगती झाली आहे.’

३. कु. संगम शेंडे (वय १६ वर्षे), खोपोली

अ. ‘कु. भावार्थच्या माध्यमातून मला साधक मित्र मिळाला. तो मला साधनेत साहाय्य करील.’

४. श्री. सुनील कदम, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४ अ. जिज्ञासू वृत्ती : ‘कु. भावार्थ मला ‘आध्यात्मिक पातळी कशी घोषित करतात ? त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात ?’ असे प्रश्न विचारत असे. यातून त्याची जिज्ञासा वृत्ती लक्षात येते.’

(लेखातील सर्व सूत्रांसाठी दिनांक : ३०.९.२०२५)                      ०

५. श्री. राजेंद्र पावसकर, ठाणे सेवाकेंद्र

१. ऐकण्याची वृत्ती

‘कु. भावार्थ ८ व्या इयत्तेत शिकत असतांना ‘क्रिकेट’चा खेळ शिकण्यासाठी जात होता. त्या वेळी माझी त्याच्याशी फार ओळख नव्हती. तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘क्रिकेट हा भारतीय खेळ नाही. यामध्ये ‘करिअर’ करण्यापेक्षा तू अन्य खेळ खेळू शकतो.’’ त्यानंतर काही दिवसांनी आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितले, ‘‘भावार्थने क्रिकेट खेळायला जाणे बंद केले आहे.’’ त्या वेळी मला भावार्थचे कौतुक वाटले आणि आश्चर्यही वाटले.

२. सेवा आणि साधना यांची तळमळ

२ अ. गणेशोत्सवाच्या सुटीत साधकाला सेवेत साहाय्य करणे : एकदा मी गणेशोत्सवाच्या सुटीत भावार्थला सांगितले, ‘‘सत्सेवा केलीस, तर तुझा अभ्यासही चांगला होईल आणि सत्सेवा केल्याने तुला श्री गणेशाचा आशीर्वादही मिळेल.’’ त्या वेळी त्याने माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. त्याने दुसर्‍या दिवशी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘दादा, मी सेवेला कुठे येऊ ? मी सेवेत कसे साहाय्य करू ?’’ त्याने गणेशोत्सवाची सुटी संपून शाळा चालू होईपर्यंत मला सेवेत साहाय्य केले.

२ आ. भावार्थने सेवेविषयी जाणून घेणे आणि त्याने प्रवचनाच्या आरंभी प्रार्थना सांगितल्यावर उपस्थितांची भावजागृती होणे अन् ते धर्मकार्यात योगदान देण्यासाठी उद्युक्त होणे : मध्यंतरी आम्ही पाली (जिल्हा रायगड) या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त गावागावांमध्ये जाऊन प्रवचने घेणे, सत्संग घेणे, अशा सेवा करत होतो. तेव्हा भावार्थही आमच्या समवेत प्रसाराला येत असे. तो ‘आम्ही प्रार्थना कशा प्रकारे करतो ? विषय कसा मांडतो ?’, याविषयी जाणून घेत होता. तिसर्‍या दिवशी त्याने विचारले, ‘‘दादा, मी आज प्रवचनाच्या प्रारंभी प्रार्थना आणि प्रवचनाचा उद्देश सांगू का ?’’. भावार्थने प्रार्थना सांगितल्यावर उपस्थितांची भावजागृती झाली. त्याने उद्देशही सांगितला. त्या वेळी अनेक जणांनी ‘या लहान मुलाप्रमाणे आम्हालाही धर्मकार्यात योगदान द्यायला हवे’, असे मत व्यक्त केले.

२ इ. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा केल्याने संतांनी खाऊ देणे : एकदा मे मासाच्या सुटीत भावार्थ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी गेला होता. त्या वेळी त्याला संतांनी वापरलेले साहित्य व्यवस्थित पुसून उन्हात ठेवून नंतर ते व्यवस्थित ठेवण्याची सेवा दिली होती. त्याची सेवा पाहून सेवा देणार्‍या साधकांनीही भावार्थचे कौतुक केले. त्याने भावपूर्ण सेवा केल्याने संतांनी त्याला खाऊ दिला.

२ ई. खोपोली येथे एखादा उपक्रम असल्यास भावार्थ स्वतःहून सेवा मागून घेतो आणि ती सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

३. नामजपादी उपायांचे गांभीर्य

एकदा युवा साधक शिबिराच्या निमित्ताने भावार्थ ठाणे येथील सेवाकेंद्रात आला होता. त्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणिपू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत, वय ५६ वर्षे) यांचे मार्गदर्शन होते. त्या वेळी त्यांनी ‘नामजपादी उपायांचे महत्त्व आणि त्याचे लाभ’ यांविषयी सांगितले. भावार्थ घरी गेल्यावर स्वतःचे नामजपादी उपाय व्यवस्थित होण्यासाठी त्याने वडिलांना ‘नामजपादी उपाय कसे करायचे ? नामजप कसा शोधायचा ?’, याविषयी विचारून घेतले. त्यानुसार तो आता नामजपादी उपाय करतो.

४. संतांप्रती भाव

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपोली येथे आल्या असतांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था भावार्थच्या घरी केली होती. भावार्थला हे समजल्यावर त्याने घराची शुद्धी केली. त्याने संतांना बसण्यासाठी आसंदी सिद्ध करून ठेवली. त्याने घरातील सर्व साहित्य आवरले. संतांची व्यवस्था घरातील ज्या खोलीत करण्यात आली होती, ती खोली त्याने व्यवस्थित आवरून ठेवली. त्याने सर्व सेवा मनापासून केल्या. संतांनीही भावार्थचे कौतुक केले.

‘भावार्थ वयाने लहान असूनही त्याच्याकडून मला शिकण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ (१.१०.२०२५)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.