‘सांगली जिल्ह्यातील पलूस येथील साधक श्री. शिवाजीराव बर्गे (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७६ वर्षे) यांना बर्याच दिवसांपासून माझी भेटण्याची इच्छा होती. माझी त्यांच्याशी ५ वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भेट झाली होती. त्यांना झालेल्या दुर्धर आजारामुळे ते घराबाहेर पडत नसत. २३.५.२०२६ या दिवशी माझी आणि श्री. बर्गे यांची भेट झाली. त्या वेळी श्री. बर्गे यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री बर्गे यांच्या घरात आश्रमाप्रमाणे स्पंदने जाणवणे
‘मी श्री. बर्गे यांच्या घराच्या पायर्या आणि उंबरठा यांना वंदन करून त्यांच्या घरात गेलो. त्या वेळी मी ‘भव्य दिव्य अशा आश्रमातच प्रवेश करत आहे’, असे मला वाटले. त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरील श्री महालक्ष्मीदेवीच्या प्रतिमेचे दर्शन घेतांना ‘माझ्या देहाची शुद्धी होत आहे’, असे मला वाटले. सर्व खोल्यांमध्ये स्वच्छता आणि टापटीप होती. घरातील वातावरण शांत आणि चैतन्यदायी वाटले. हे सर्व पाहून ‘महालक्ष्मी निवास’ (आश्रम) असे नाव माझ्या डोळ्यांसमोर आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ‘घराचा आश्रम कसा असावा ?’, हे मला पहायला मिळाले.

२. सेवेची तळमळ
श्री. बर्गेकाकांना कंपवातासारखा गंभीर आजार आहे. त्यांना इतरांचे साहाय्य घेतल्याविना काही करता येत नाही. त्यांनी स्वतःची स्थिती पूर्णपणे स्वीकारली आहे. त्याही स्थितीत ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या लेखाशी संबंधित सेवा करतात.
३. स्वतः आनंदी असून इतरांनाही आनंद देणारे श्री. शिवाजीराव बर्गे !
ते सतत आनंदी असतात, तसेच त्यांची पत्नी (सौ. सत्त्वशीला बर्गे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) आणि मुलेही त्यांची मनापासून सेवा करतात. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण आनंदी आहे.
४. बर्गेकाकांच्या खोलीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. बर्गेकाकांच्या खोलीत गेल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप आपोआप चालू झाला. माझा नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने होऊ लागला. इतर सर्व खोल्यांपेक्षा बर्गेकाकांच्या खोलीत मला अधिक चैतन्य जाणवले.
आ. काकांकडे पाहिल्यावर ‘ते सतत अनुसंधानात आहेत’, असे मला वाटले.
इ. ‘कधी कधी ते शून्यात दृष्टी लावून ध्यानस्थ बसले आहेत’, असे मला जाणवले.
ई. मला हलकेपणा जाणवला. ‘मी हवेत तरंगत नामजप करत आहे’, असे मला वाटले.
५. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव जाणवणे
मी काकांच्या घरातील ध्यानमंदिरात गेल्यावर माझा आपोआप ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा जप चालू झाला. सर्वप्रथम माझे प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे लक्ष गेले. मला ते छायाचित्र सजीव वाटले. ‘त्यांच्या पापण्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले. माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण झाला.
६. ‘प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रांचा रंग फिकट होऊन ती छायाचित्रे निर्गुणाकडे जात आहेत’, असे वाटणे
बर्गेकाकांच्या एका खोलीत ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिष्यावस्था आणि गुरुरूप’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ या दोन्ही ग्रंथांच्या मुखपृष्ठावरील ‘प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रांचा रंग फिकट होऊन ती छायाचित्रे निर्गुणाकडे जात आहेत’, असे मला वाटले.
७. श्री. बर्गेकाका यांची मोठी मुलगी डॉ. शिल्पा बर्गे यांनी मला सांगितले, ‘‘सद्गुरु स्वाती खाडये (वय ४८ वर्षे) यांनी बर्याच वेळा या वास्तूत निवास केला आहे. त्यामुळे या वास्तूतील चैतन्य वाढले आहे.’’
८. ‘सद्गुरु आणि संत यांना आलेल्या विविध अनुभूतींवरून ‘महालक्ष्मी निवास’ (आश्रम) हे नाव यथार्थ आहे’, असे वाटणे
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांनी ‘सर्वांत अधिक चैतन्य श्री. बर्गेकाकांच्या खोलीत आहे’, असे सांगितले. सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७७ वर्षे) प्रवेशद्वारासमोर असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या प्रतिमेजवळ गेल्यावर त्यांना शक्तीची स्पंदने जाणवली. त्यामुळे देवाने सुचवलेले ‘महालक्ष्मी निवास’ (आश्रम) हे नाव यथार्थ आहे’, असे मला वाटले. यावरून ‘मला जाणवलेली स्पंदने प.पू. गुरुदेवांपर्यंत पोचली’, असे मला वाटले’, त्याबद्दल मी गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
९. बर्गेकाकांच्या घरी गेल्यावर मला ‘स्वतःला मनापासून कसे स्वीकारायचे ? कोणत्याही परिस्थितीत सेवा करून आनंदी कसे राहू शकतो ? कुटुंबियांमधील सेवाभाव आणि प्रेमभाव अन् इतरांचा विचार कसा करावा ?’, इत्यादी गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला ही सूत्रे शब्दबद्ध करता आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८१ वर्षे), गावभाग, सांगली. (२४.५.२०२६)
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !