
भांडुप – येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीत दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता दौडीला प्रारंभ झाला. नियमित ९ दिवस सकाळी ज्योत घेऊन धारकरी दौड करत ठराविक अंतर गाठत होते. विजयादशमीच्या दिवशी आई आदिशक्ती नवरात्रोत्सव मंडळ, टेंभीपाडा ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज तलाव असा दौडीचा मार्ग होता. या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे शस्त्रपूजन करण्यात आले.
या दौडीत धारकरी पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर भगवा फेटा घालून शिस्तबद्ध पद्धतीने जात होते. त्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक थांबून कौतुकाने पहात होते.
महिलांनी ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पूजन करून आरती केली. दौडीत धारकरी वीरश्रीयुक्त क्षात्रगीते म्हणत होते. या दौडीत १० ते १५ वर्षांच्या मुलांनी तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके दाखवली. वक्त्यांनी दुर्गामाता दौडीचा उद्देश सांगितला आणि ध्येयमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !