‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून फर्मागुडी (गोवा) येथील ‘इन्फिनिटी’ मैदानात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी (१८.५.२०२५ या दिवशी) सायंकाळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते सनातन धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ‘संतांच्या हस्ते होणार्या ध्वजारोहणाचा तेथील वातावरणावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन
ध्वजारोहणाचा तेथील वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी तेथील भूमी, पाण्याचा आणि हवेचा नमुना यांची ध्वजारोहणापूर्वी अन् ध्वजारोहणानंतर छायाचित्रे काढण्यात आली. ध्वजारोहणाच्या वेळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ‘संगीत विभागा’तील साधक आणि साधिका यांनी सनातन राष्ट्र शौर्यगीत गायले. याचा त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी गीत गाण्यापूर्वी आणि गायल्यानंतर त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची ध्वजारोहणापूर्वी आणि ध्वजारोहणानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ अ. संतांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाचा तेथील वातावरणावर झालेला परिणाम : चाचणीतील कोणत्याही घटकात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. ध्वजारोहणानंतर सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
१ अ १. निष्कर्ष : ध्वजारोहणानंतर तेथील भूमी, पाण्याचा नमुना आणि हवेचा नमुना यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. यातून ‘संतांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाचा तेथील वातावरणावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, हे लक्षात येते.
१ आ. सनातन राष्ट्र शौर्यगीत गायनाचा साधक आणि साधिका यांच्यातील सूक्ष्म-ऊर्जेवर झालेला परिणाम : साधक आणि साधिका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. गीत गायल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
१ आ १. निष्कर्ष : सनातन राष्ट्र शौर्यगीत गायल्यानंतर साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यातून ‘सनातन राष्ट्र शौर्यगीत गायनाचा साधक आणि साधिका यांच्यातील सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात आले.

१ इ. ध्वजारोहणानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : ध्वजारोहणापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ६४४५ किलोमीटर होती आणि ध्वजारोहणानंतर ती ७३३४ किलोमीटर झाली, म्हणजे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत ८८९ किलोमीटरने वाढ झाली.
१ ई. महोत्सव कालावधीत ध्वजस्तंभावर झालेला परिणाम : महोत्सव कालावधीत ध्वजस्तंभावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ध्वजस्तंभाची महोत्सवापूर्वी आणि महोत्सव कालावधीत प्रतिदिन छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
१ ई १. निष्कर्ष : महोत्सवापूर्वीही ध्वजस्तंभात चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ध्वजस्तंभातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३०५० मीटर होती. महोत्सवाच्या दुसर्या दिवशी ध्वजारोहणानंतर ध्वस्तंभातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली. महोत्सव संपल्यानंतरही त्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात टिकून आहे. यातून ‘महोत्सव कालावधीत ध्वजस्तंभावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात आले.
१ उ. महोत्सवानंतरही ध्वजातील सकारात्मक ऊर्जा टिकून असणे : महोत्सवापूर्वीही ध्वजात चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. महोत्सव संपेपर्यंत ध्वज तेथे डौलाने फडकत होता. महोत्सवानंतर ध्वज ध्वजस्तंभावरून खाली उतरवण्यात आला. महोत्सवानंतरही ध्वजातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात टिकून आहे, हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. सनातन धर्मध्वजातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे : महोत्सवाच्या दुसर्या दिवशी (१८.५.२०२५ या दिवशी) दुपारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सनातन धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर सायंकाळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सनातनच्या तीनही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) उपस्थितीमुळे ध्वजारोहण स्थळाचे वातावरण चैतन्यमय बनले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन धर्मध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर ध्वजातील चैतन्य कार्यरत होऊन ते वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे तेथील वातावरण पुष्कळ चैतन्यमय बनले.
२ आ. सनातन राष्ट्र शौर्यगीताचे गायन करणारे साधक आणि साधिका यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ‘संगीत विभागा’तील साधकांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ हा दृष्टीकोन ठेवून त्यांच्यातील कलेचा उपयोग त्यांच्या ‘साधने’साठी केला आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या हस्ते होणार्या सनातन धर्म ध्वजारोहणाच्या वेळी गायनसेवा करायला मिळणे, हे परमभाग्याचे आहे’, असा या साधकांचा भाव आहे. साधकांनी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण केलेल्या गायन सेवेमुळे उपस्थितांमध्ये वीरश्री संचारली. साधकांनाही या सेवेतून आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाला.
२ इ. ध्वजारोहणाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात कार्यरत होणे : ध्वजारोहणाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमधील चैतन्य पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले. ‘सनातन धर्मध्वजाचे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या हस्ते ध्वजारोहण होणे’, हे जणू सनातन राष्ट्राच्या स्थापनेचा काळ जवळ आल्याचे द्योतक आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.७.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!