तक्रार करणार्याच्या बहिणीच्या घरातच सापडले सोने

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील शबरीमला मंदिराच्या मूर्तीवरील गायब झालेले ४ किलो सोने सापडले आहे. उन्नीकृष्णन् पोटी यांनी मंदिराला हे सोने दान केले होते. सोन्याचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या बहिणीच्या घरातच ते सापडले. उन्नीकृष्णन् पोटी हे बेंगळुरूचे रहिवासी आहेत. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंदिराचे व्यवस्थापन करणार्या त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या दक्षता शाखेने हे सोने जप्त केले.
वर्ष २०१९ मध्ये शबरीमला मंदिरातील अनेक मूर्ती आणि भिंती यांवर ४२ किलो सोन्याचा मुलामा लावण्यात आला होता. हे काम वर्ष २०२० मध्ये पूर्ण झाले. कोरोना महामारीच्या नियमांमुळे सोन्याचा मुलामा काढून टाकण्यात आला आणि तो देवस्वम् मंडळाकडे सोपवण्यात आला. हे सोने पॉलिश करण्यासाठी चेन्नईच्या एका आस्थापनाला देण्यात आले होते. त्याने अहवाल दिला की, या सोन्याचे वजन ४२ किलोऐवजी ३८ किलोग्रॅम होते. त्यामुळे ४ किलो सोने गहाळ झाल्यावरून याची चौकशी चालू करण्यात आली होती.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा