(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
चंडीगड – हरियाणातील पलवल जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन हिंदु मुलीला बळजोरीने मशिदीत नेऊन बंदिस्त करण्यात आले. तिथे तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी मौलवीसह ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार २४ सप्टेंबरच्या सायंकाळी आई-वडील घरात नसल्याची संधी साधून एक मुसलमान तरुण घरात घुसला आणि त्याने त्यांच्या मुलीला मशिदीत नेले. ते घरी परतले तेव्हा मुलगी घरात नव्हती. शोध घेतल्यावर मुलीला मशिदीत नेल्याचे त्यांना कळले. मशिदीत गेल्यावर त्यांनी पाहिले की, मुलीला बंदिस्त करण्यात आली आहे आणि तेथे अनेक लोक जमले आहेत. तेथे मुलीचे बलपूर्वक धर्मांतर चालू होते. तिच्या हातातील पवित्र धागा कापण्यात आला होता, तसेच कपाळावरील कुंकू पुसण्यात आले होते. वडिलांनी कशीबशी मुलीची सुटका केली.
पोलीस उपायुक्त नरेंद्र खटाना यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे मौलवीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मौलवीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला यज्ञ आणि पूजा-अर्चा यामध्ये रस आहे आणि याच कारणास्तव तिला लक्ष्य केले गेले. (यातून धर्मांधांमध्ये हिंदुद्वेष कसा ठासून भरला आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकामुसलमानांना कशाचेही भय न राहिल्याने ते अशा प्रकारे हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. अशांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |

व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी