(‘जेन-झी’ म्हणजे वर्ष १९९६ ते २०१० या कालावधीच जन्मलेली पिढी) |

लेह (लडाख) – येथे काही दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारी आंदोलनात नुकतेच पोलिसांवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी २ नेपाळी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यासमवेतच चिथावणीखोर भाषण करणारे पर्यावरणवादी आणि नेते सोनम वांगचुक यांना २६ सप्टेंबरच्या दुपारी अटक करण्यात आली. लेह येथील आंदोलनाची तुलना नेपाळच्या ‘जेन-झी’च्या आंदोलनाशी केली होती. या प्रकरणी आतापर्यंत अनुमाने ६० जणांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनात नेपाळी लोकांच्या सहभाग असल्याचे आढळून आल्यामुळे या हिंसाचारामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचे उघड आले आहे.
🚨 Leh unrest: #SonamWangchuk & 2 Nepalis arrested for inciting protests, comparing them to Nepal's "Gen-Z" movement. 60+ detained.
Wangchuk’s NGO FCRA license revoked.
⚠️ Are foreign forces fueling the violence? Must be investigated!#Ladakh #LehProtests
PC: @KreatelyMedia https://t.co/Proxkwuy3r pic.twitter.com/Po5q01ovM5— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 26, 2025
वांगचुक यांच्या अशासकीय संस्थेची विदेशी निधी मिळवण्याची अनुज्ञप्ती रहित !
१. २५ सप्टेंबरला त्यांच्या अशासकीय संस्थेला ‘विदेशी योगदान (नियमन) कायदा’, म्हणजेच ‘फॉरिन कॉन्ट्रिब्यूशन (रेग्युलेशन) ॲक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) अंतर्गत विदेशी निधी मिळवण्याची अनुज्ञप्ती रहित करण्यात आली.
२. २४ सप्टेंबरला वांगचुक यांनी आंदोलन मागे घेत म्हटले होते की, लेहमधील निदर्शने ही ‘जेन-झी क्रांती’ असून बेरोजगारी, तसेच लोकशाहीतील अधिकार हिरावले जात असल्याने तरुण संतप्त झाले आहेत.
आंदोलनात झाला होता हिंसाचार !
आंदोलनामुळे चालू असलेला हिंसाचार अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला, तर किमान ५० जण घायाळ झाले होते. आंदोलकांनी लेहमधील भाजपच्या कार्यालयालाही आग लावली होती. ‘लडाखला राज्याचा दर्जा मिळावा’, या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून उपोषण करणारे वांगचुक यांनी २४ सप्टेंबरला त्यांचे उपोषण मागे घेतले होते.
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !