
सांगली, २५ सप्टेंबर – भारतमातेच्या हिंदुत्वाच्या कुंकू रक्षणासाठी हिंदुस्थानच्या प्रत्येक गावात श्री दुर्गामाता दौड चालू करायची आहे. भारतमातेच्या संसाराचे विस्कटलेले गणित दुरुस्त करणारे नवरात्र बसवायचे आहे. तानाजी मालुसरे, हिरोजी इंदूलकर आणि यांसारख्या अनेक मावळ्यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची सेवा केली, जिवाचे रान केले, बलीदान दिले आणि हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात उतरवले. एक विलक्षण असा जिवाचा आकांत करून या सर्वांनी हिंदवी स्वराज्य साकार केले. तोच आदर्श आपल्याला समोर ठेवायचा आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीत ४ थ्या दिवशी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ७६ वर्षांनीसुद्धा या हिंदुस्थानची स्थिती विषण्ण आणि विच्छिन्न आहे ! आज आपल्या देशात अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने यांचे बळ आहे. हे बळ वापरण्याची क्षमता आणि सामर्थ्य निर्माण होण्यासाठी हिंदुस्थानच्या मनामनांत छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखी विलक्षण धारणा उत्पन्न व्हावी. या हिंदुस्थानासाठी हे वरदान देवीने आपल्याला द्यावे आणि ते मागण्यासाठी आपण देवीच्या दारात आलो आहोत, तसेच यांसाठी देवीने आपल्याला शक्ती अन् बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना आपण करूया.’’
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari