Davanagere Violence : दावणगेरे (कर्नाटक) येथे  मुसलमानांकडून हिंदूंना घरांत घुसून मारहाण

‘आय लव्ह महंमद’ हा फलक घरांच्या दारावरच लावल्याने विरोध केल्यामुळे हिंदूंवर आक्रमण

दावणगेरे (कर्नाटक) – उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये चालू झालेला ‘आय लव्ह महंमद’ लिहिलेला फलकाचा वाद उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आता कर्नाटक राज्यातही पोचला आहे. दावणगेरे येथील कार्ल मार्क्स नगरमध्ये मुसलमानांनी हिंदूंच्या घरांच्या दारावरच ‘आय लव्ह महंमद’ लिहिलेले फलक लावले होते.

याला हिंदूंनी विरोध केला असता मुसलमानांनी हिंदूंच्या घरांत घुसून हिंदूंना, विशेषतः घरांतील हिंदु महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना २४ सप्टेंबरच्या रात्री घडली. यात ३ जण घायाळ झाले असून उपचारांसाठी त्यांना दावणगेरे जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१. ३ दिवसांपूर्वीही ‘आय लव्ह महंमद’ लिहिलेले फलक लावले होते. याला हिंदूंनी आक्षेप घेतल्यानंतर ते काढण्यात आले होते.

२. तरीही २४ सप्टेंबरच्या रात्री मुसलमानांनी ‘आय लव्ह महंमद’चे फलक हिंदूंच्या घरांच्या दारावरच लावले होते. ‘हे फलक येथे लावू नका,’ असे सांगितल्यावर हा वाद वाढला. हा वाद काही तरुणांमधील हाणामारीपर्यंत पोचला.

३. ‘आय लव्ह महंमद’चा फलक ब्लेडने फाडण्यात आल्याची खोटी माहिती सामाजिक माध्यमांद्वारे पसरवण्यात आल्यामुळे येथे २०० हून अधिक मुसलमान गोळा झाले आणि त्यांनी हिंदूंना त्यांच्या घरांत घुसून मारहाण केली, अशी माहिती पीडित हिंदूंनी दिली.

४. तेथे फक्त २ हिंदूंचे घरे आहे. हिंदूंच्या घरांना लक्ष्य करून दगडफेक केल्याने हिंदू नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘भूमी जिहाद’साठी हिंदूंच्या घरांना लक्ष्य करून दगडफेक केली जात आहे. ‘लांगूलचालनाच्या राजकारणामुळे अशा घटना घडत आहेत. दगडफेक करणार्‍यांवर कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

५. घटनेनंतर दावणगेरेच्या पोलीस अधीक्षक उमा प्रशांत यांनी माहिती दिली की, फलक लावण्याच्या सूत्रावरून २ समाजांमध्ये वाद झाला होता. आमच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, परिस्थिती शांत आहे. दगडफेकीच्या घटनेची चौकशी करून कारवाई करू.

पोलिसांसमोर आक्रमण होऊनही पोलीस शांतच !

आमच्या घरातील महिलांवर आक्रमण करण्यात आले. पोलिसांसमोरच आक्रमण झाले, तरी पोलीस शांत राहिले. (अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे ! – संपादक) आम्हाला येथे रहाण्याची भीती वाटत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित हिंदूंनी या प्रकरणी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकात हिंदूंनी निवडून दिलेले धर्मांध मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार सत्तेत असल्याने हिंदूंना हेच भोगावे लागत आहे आणि पुढेही भोगत रहावे लागणार आहे !
  • कर्नाटकातील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार  विसर्जित करावे, अशी मागणी हिंदूंच्या संघटनांनी करणे आवश्यक आहे !