ज्यामुळे लौकिक आणि परमार्थिक कल्याणाची सिद्धी प्राप्त होते, त्याला ‘धर्म’ असे म्हणतात. धर्माच्या या व्याख्येवरून आपली संस्कृती ऐहिक आणि परमार्थिक जीवन यांमध्ये भेद करत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते. भौतिक जीवन आणि पारलौकिक जीवन यांचा सुंदर समन्वय आपल्या वैदिक संस्कृतीने साधलेला आहे. याला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था आपल्याकडे निर्माण करण्यात आली होती. आपण आपल्या धर्माचे योग्य प्रकारे आचरण केले नाही, तर आपणच आपल्या धर्माच्या नाशाला कारणीभूत ठरतो. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही.
मागील लेखात ‘विकृत मनोवृत्तीच्या बळावर संपूर्ण मानवी समाजाला वेठीला धरण्याचा साम्यवाद्यांचा प्रयत्न’ याविषयीची सूत्रे पाहिली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ४)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/960010.html

११. साम्यवाद्यांचा कोणत्याही प्रकारच्या विकासाला विरोध
बौद्धिक, मानसिक, वैचारिक, शारीरिक यांच्या दृष्टीने दुर्बल असलेल्या घटकांना सबल करण्याचा प्रयत्न करणे सुविद्य आणि सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. तसे प्रयत्न करूनही त्यांच्यात विकास होत नसेल, तर त्यांचा ममतेने प्रतिपाळ करून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे, हेसुद्धा सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. या विचारांना मूठमाती देण्याचा घाट वामपंथियांनी (डाव्यांनी म्हणजेच साम्यवाद्यांनी) घातला.

उत्कृष्टता आणि गुणवत्ता असणे, हा दोष ठरवून उच्चभ्रू समाजात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न साम्यवादी विचारांच्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आहे. ‘उत्कृष्टता आणि गुणवत्ता हा उच्च वर्णियांचा गुण नसून अवगुण आहे’, असे ठरवण्यात ते यशस्वी होत आहेत. त्यामुळे क्षमता, कष्ट, गुणवत्ता, कामगिरी, शिस्त यांचे महत्त्वही हिरावून घेतले गेले. साम्यवाद्यांना ‘संपूर्ण जगात कोणत्याही प्रकारचा विकास व्हावा’, असे वाटत नाही. संपूर्ण मानवी समाज मागास आणि जंगली व्हावा, यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. भौतिक, मानसिक, वैचारिक असा कोणत्याही प्रकारचा विकास त्यांना मान्य नाही; म्हणून सर्व विकासकामांना त्यांचा विरोध आहे. आपल्या देशातील विकासकामांना नक्षलवाद्यांनी केलेला विरोध, हे त्याचे उदाहरण आहे. नक्षलवाद हे साम्यवादी विचारसरणीचे एक अंग आहे.
१२. साम्यवाद्यांच्या दृष्टीने पारंपरिक मूल्यांचे जतन करणारे वाईट
समाजातील कोणता वर्ग चांगला आणि वाईट ? हे ठरवण्याचा साम्यवाद्यांचा मापदंड वेगळा आहे. जी व्यक्ती राष्ट्रवादाला महत्त्व देते, साम्यवादी विचारसरणीच्या विरोधात ठामपणे उभे राहून पारंपरिक मूल्यांचे जतन करते, ती व्यक्ती साम्यवादी लोकांच्या दृष्टीने वाईट आहे.
आपल्या देशात शेतकर्यांच्या विधेयकाला विरोध झाला. ‘सीएए’चा (नागरिकत्व सुधारणा कायद्याचा) मुसलमानांच्या नागरिकत्वाशी कोणताही संबंध नसतांना तो लावला गेला आणि त्यामुळे मुसलमानांच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित झाल्याचा दावा याच साम्यवाद्यांनी केला. ‘हिंदुस्थानची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे, राज्यघटनेनुसार राज्यकारभार केला जात नाही’, असा भ्रम सर्वसामान्य जनतेत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. खोटे कथानक रचून त्याचा प्रचार-प्रसार करून सत्याला तिलांजली देण्याचा जोरदार प्रयत्न भारतात चालू आहे.
१३. प्रांताप्रांतांत वैमनस्य निर्माण करून देशाची अखंडता धोक्यात आणण्याचा साम्यवाद्यांचे आटोकाट प्रयत्न
देशातील प्रांताप्रांतांत वैमनस्य निर्माण करून देशाची अखंडता धोक्यात आणणे, हे मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साम्यवादी आटापिटा करत आहेत. देशातील अशिक्षित आणि अर्धशिक्षित समाजाला मानसिकदृष्ट्या दुर्बल करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. ‘त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे’, अशी भावना त्यांच्यात निर्माण करून घटनात्मक पद्धतीने सत्तेवर आलेल्या सरकारचा तिरस्कार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जात आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारकेपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेल्या हिंदुस्थानात असलेली संस्कृतिक अन् धार्मिक नाळ तोडण्याचाही प्रयत्न याच साम्यवाद्यांकडून वारंवार केला जात आहे. त्यांचा हा डाव अयशस्वी करण्यासाठीच आपल्यात प्रतिकार, निष्ठा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. या बौद्धिक आणि वैचारिक पातळीवरील संघर्षात आपण प्रवाह पतीत न होता साम्यवाद्यांना पराभूत करण्यासाठी आपल्या विचारांची, आचाराची आणि बुद्धीची बैठक तेजस्वी करण्यासाठी गीता, उपनिषदे, रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास करणे नितांत आवश्यक आहे.
१४. संस्कारांची, संस्कृतीची, न्याय, नैतिकतेची कास धरावीच !
समाजाचे स्वास्थ्य टिकून रहाण्यासाठी, समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा, यासाठी सत्य, न्याय, नैतिकता या तत्त्वत्रयींचा आधार घेऊनच आपल्याला वावरावे लागणार आहे. साम्यवाद्यांची ही वक्रचाल ओळखून त्यांच्या काल्पनिक कथांना न भूलता सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ भूिमका आपण बजावली, तर आपला देश, संस्कृती अन् धर्म अबाधित राखणे सहज शक्य आहे. त्यामुळेच संस्कारांची, संस्कृतीची, न्याय, नैतिकतेची कास आपल्याला सोडून चालणार नाही.
(समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.९.२०२५)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !