
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापिठातील संशोधकांच्या एका गटाने ‘एल्सेव्हियर’ या प्रकाशक संस्थेच्या साहाय्याने जागतिक स्तरावरील सर्वाेच्च शास्त्रज्ञांची सूची नुकतीच प्रकाशित केली. त्यानुसार ‘पतंजलि आयुर्वेद’चे आचार्य बालकृष्ण यांचा जगातील सर्वाेच्च २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. दृढ निश्चय आणि उत्कटता असेल, तर काहीही साध्य करता येते, हे आचार्य बालकृष्ण यांनी भारताच्या समृद्ध प्राचीन ज्ञानाचे आधुनिक वैज्ञानिक पद्धतींशी सुंदर मिश्रण करून सिद्ध केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे जगभरातील भविष्यातील शास्त्रज्ञांना नैसर्गिक औषधी वनस्पतींचे लाभ शोधण्यासाठी प्रेरणा मिळेल.
आचार्य बालकृष्ण यांचे आयुर्वेदातील अफाट कार्य !
१. संशोधन आणि आयुर्वेद यांमधील आचार्य बाळकृष्ण यांचे सखोल कौशल्य अन् त्यांचेा प्रेरणादायी नेतृत्व यांमुळे आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये ३०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.
२. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजलीने पुराव्यांवर आधारित १०० हून अधिक आयुर्वेदिक औषधे विकसित केली आहेत. ती सर्वांच्या कल्याणासाठी ॲलोपॅथी उपचारांना सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय प्रदान करतात.
३. योग आणि आयुर्वेद यांवरील १२० हून अधिक पुस्तकांचे ते लेखक असून २५ हून अधिक अप्रकाशित प्राचीन आयुर्वेदिक हस्तलिखितांमध्ये आचार्यांचे योगदान आहे.
४. ‘हर्बल एनसायक्लोपीडिया’द्वारे नैसर्गिक औषधी वनस्पतींची सूची सिद्ध करण्याच्या त्यांच्या कार्याने भविष्यातील शास्त्रज्ञांसाठी एक मौल्यवान संसाधन स्थापित केले आहे.
आचार्यांचा सन्मान हा पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानात लपलेल्या अफाट क्षमतेचे प्रतिबिंब ! – योगऋषी रामदेवबाबायासंदर्भात योगऋषी रामदेवबाबा म्हणाले की, आचार्य बालकृष्ण यांनी केवळ आयुर्वेदाला वैज्ञानिक मान्यता दिली नाही, तर जगभरातील शास्त्रज्ञांसाठी निसर्गोपचारात संशोधनाचे नवे मार्गही उघडले आहेत. जगातील सर्वाेच्च शास्त्रज्ञांमध्ये आचार्यांचा समावेश होणे, हे नैसर्गिक औषधी वनस्पती आणि पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानात लपलेल्या अफाट क्षमतेचे प्रतिबिंब आहे. |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !