अमेरिकेच्या ‘एच् १-बी’ व्हिसाच्या शुल्कवाढीवर चीनचे प्रत्युत्तर
(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.)

बीजिंग (चीन) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी नवीन ‘एच १-बी’ व्हिसासाठी १ लाख डॉलर्स (८८ लाख रुपये) शुल्क वाढवल्यावर भारतासह अनेक देशांतील तरुणांना अडचण निर्माण झाली आहे. त्यातही भारतियांना याचा अधिक फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर चीनने जगभरातील तरुणांना, विशेषतः तंत्रज्ञान, अभियांत्रिकीसह आदी महत्त्वाच्या क्षेत्रांतील तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘के व्हिसा’ श्रेणी चालू करण्याची घोषणा केली. हा निर्णय १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे.
🚨 China hits back at US H-1B fee hike 🚨
🇨🇳 After US hiked visa fees to $100K, China unveils ‘K-Visa’ — launching 1 Oct 2025
🎓 For grads from top Chinese & global institutions
📜 No invitation needed
⏳ Long-term stay + academic, tech, cultural accessUS closes doors. China… pic.twitter.com/zm3T7Y1aCm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 22, 2025
कोण अर्ज करू शकतो ?
ज्यांनी चीन किंवा विदेशातील प्रतिष्ठित विद्यापिठे किंवा संशोधन संस्थांमधून उच्च पदवी प्राप्त केलेली असेल, ते या व्हिसासाठी अर्ज करू शकतात. अर्जदारांनी चिनी अधिकार्यांनी निश्चित केलेली पात्रता आणि आवश्यकता पूर्ण केलेली असली पाहिजेत आणि कागदपत्रे प्रदान केली पाहिजेत.
‘के व्हिसा’ची प्रमुख वैशिष्ट्ये !
१. के व्हिसाची प्रवेश वैधता दीर्घ असेल आणि चीनमध्ये रहाण्याचा कालावधी वाढवण्यासह आदी सुविधा प्राप्त होतील.
२. अनेक इतर कामाच्या व्हिसांप्रमाणे या व्हिसासाठी अर्ज करतांना संबंधित आस्थापना ‘आमंत्रण पत्र’ घेण्याची आवश्यकता नसेल.
३. चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘के व्हिसा’धारकांना उद्योजक आणि व्यावसायिक यांना चीनच्या शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानातील शैक्षणिक देवाण-घेवाण, यात भाग घेण्याची अनुमती दिली जाईल.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला