|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्याने मान्य केल्यानंतर आता लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यानेही भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकमधील मुरीदके येथील त्यांचे प्रशिक्षण तळ नष्ट झाल्याची स्वीकृती एका व्हिडिओद्वारे दिली. कासिमच्या या स्वीकृतीमुळे पाकिस्तानचा खोटा मुखवटा उतरला आहे. पाकिस्तान दावा करत होता की, या इमारतीचा वापर आतंकवादी संघटना करत नाहीत.
या व्हिडिओमध्ये कासिम एका बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी उभा राहिला आहे. तो म्हणतो की, ७ मेच्या सकाळी झालेल्या आक्रमणात मुरीदके येथील मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. मी मुरीदके येथील मरकज तोयबाच्या अवशेषांवर उभा आहे, जे आक्रमणात नष्ट झाले. याचे पुनर्निर्माण चालू आहे. अल्लाच्या कृपेने ही मशीद आधीपेक्षा फार मोठी उभी राहील. अल्ला तिला आपल्या अनुयायांसाठी समृद्ध करो.
💥 After Jaish, now a LeT terrorist admits India’s #OperationSindoor – Muridke HQ in Pakistan was destroyed on 7 May.
📹Lashkar-e-Taiba Commander Qaasim confirmed it was a jihadi training camp & even urged youth to join again.
🇮🇳 Time for India to use this proof to push the… pic.twitter.com/cQgjSEbDG7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 19, 2025
कासिम पुढे हेही मान्य करतो की, या मशिदीत अनेक आतंकवादी आणि विद्यार्थी यांना प्रशिक्षण मिळाले आणि त्यांनी विजयही मिळवला.
कासिम याचे आतंकवाद्यांच्या भरतीसाठी आवाहन
कासिमचा आणखी एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यात तो पाकिस्तानी युवकांना मुरीदके येथील मरकज तोयबामध्ये दौरा-ए-सुफ्फा या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतो. दौरा-ए-सुफ्फा हा आतंकवादी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्यामध्ये जिहादी प्रशिक्षण दिले जाते.
संपादकीय भूमिका
|
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला