
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरातील पुरातन श्री ब्रह्मदेव मूर्तीभंग प्रकरणात संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजापूर येथे साखळी उपोषण चालू आहे. उपोषणाच्या दुसर्या दिवशी आंदोलनस्थळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.
या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी तत्कालीन व्यवस्थापक तथा तहसीलदार, तसेच पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालक यांचे तात्काळ निलंबन अन् गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. पालकमंत्री सरनाईक यांनी ३० दिवसांत कारवाई पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर दिले.
या वेळी महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री परिक्षित साळुंके, सुदर्शन वाघमारे, प्रणव देवकते, सौरभ कदम, अमित कदम, अक्षय परमेश्वर, सुरेश नाईकवाडी, शहाजी जगदाळे, अभिषेक पवार, आंबरेश्वर देशमुख, प्रदीप इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
सहस्रो एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकार्यांकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना !