महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
फौजदारी गुन्हे नोंदवून बडतर्फही करणार

मुंबई – भूमीच्या हक्कात अनधिकृतपणे फेरफार करणारे आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करणारे महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी अन् तहसीलदार यांच्यासह १५ भ्रष्ट अधिकार्यांना निलंबित करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १० जुलै या दिवशी विधान परिषदेत केली. दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवून काहींना शासकीय सेवेतून बडतर्फ केले जाईल, असे सांगत सरकारने पुढील ३ महिन्यांत ‘कलम १५५’ अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकार्यांना दिले. ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मागील अधिवेशनात या गंभीर घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यानंतर पुणे विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालात उघड झालेल्या एकूण ४२४ संशयास्पद प्रकरणांपैकी १३ प्रकरणांमध्ये या १५ जणांचा थेट सहभाग आढळून आला.
काय आहे प्रकरण ?
महसूल कायद्यातील ‘कलम १५५’चा वापर केवळ शासकीय कागदपत्रांतील शुद्धलेखनाच्या किंवा लिपिकीय चुका दुरुस्त करण्यासाठी करणे अपेक्षित असते; मात्र लाचखोर अधिकार्यांनी याचा अपवापर करून मूळ मालकांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती दुसर्यांच्या नावावर केल. यासह पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय धारिका गहाळ केल्या.
श्री क्षेत्र तुळजापूर येथील भूमी हडपणार्यांवरही होणार कारवाई !श्री क्षेत्र तुळजापूर येथील देवीची भूमी आणि अन्य भूमी बळकावणे यांसह अन् तेथील अनधिकृत अतिक्रमणांच्या तक्रारींची सरकारने गंभीर नोंद घेतली आहे. पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अनधिकृत अतिक्रमणे भुईसपाट केली जातील आणि भूमी बळकावणार्या संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवले जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या वतीने सभागृहात देण्यात आले. |
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !
कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश !
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला; २ कामगार घायाळ
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !