|

फलटण (सातारा), १८ सप्टेंबर (वार्ता.) – शहरातील नाना पाटील चौक येथील पंढरपूर पुलाजवळ नीरा उजवा कालवा येथे श्री गणेशमूर्तींचे परंपरागत विसर्जन करण्यात आले; मात्र विसर्जनानंतर दोनच दिवसांत कालव्याचे पाणी बंद केल्यामुळे श्री गणेशमूर्ती कालव्याच्या तळाशी दिसू लागल्या; परंतु या श्री गणेशमूर्ती पुन्हा विसर्जित करण्याविषयी फलटण नगर परिषदेने कोणतीही उपाययोजना काढली नाही. कालव्याच्या तळाशी दिसू लागलेल्या श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली असून स्थानिक गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांविरुद्ध श्री गणेशमूर्तींची विटंबना केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी लेखी तक्रार स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. पाणी बंद होण्याविषयी कार्यकारी अभियंत्याने मुख्याधिकार्यांना पत्र लिहून गणेशोत्सव चालू होण्यापूर्वीच सूचित केले होते.
या वेळी अधिवक्ता संदीप कांबळे, अधिवक्ता गणेश जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे तालुका संयोजक श्री. अक्षय तावरे, सर्वश्री मंगेश खंदारे, अक्षय शिंदे, गणेश घनवट, गोरक्षक श्री. श्रीकांत खटावकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, आशिष कापसे आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
१. फलटण शहरातील नाना पाटील चौक येथील पंढरपूर फुलाजवळ असणार्या नीरा उजवा कालवा येथे मोठ्या आणि घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते.
२. ६ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर ८ सप्टेंबरला नीरा उजवा कालवा बंद करण्यात आला. यामुळे श्री गणेशमूर्ती कालव्याच्या तळाशी दिसू लागल्या.
३. याविषयी जाब विचारण्यासाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे गेले.
४. या वेळी कार्यकारी अभियंता बोडखे यांनी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तसेच शहर पोलीस ठाणे अन् ग्रामीण पोलीस ठाणे यांना ‘८ सप्टेंबर या दिवशी पाणी बंद होणार आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यामध्ये होणार्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर त्या कालव्याच्या तळाशी दिसून त्यांची विटंबना होऊ शकते. फलटण नगर परिषदेने कालव्यामध्ये विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती एकत्र करून पुन्हा विसर्जन करण्याचे नियोजन करावे’, अशा आशयाचे पत्र २५ ऑगस्ट या दिवशीच दिले होते, असे सांगितले.
५. यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी फलटण नगर परिषदेत जाऊन उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना वस्तूस्थिती सांगितली. या वेळी उपमुख्याधिकारी पाटील यांनी स्वच्छता निरीक्षक मुकेश अहिवळे यांच्यासमवेत घटनास्थळी भेट दिली.
६. यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात तक्रारअर्ज प्रविष्ट (दाखल) करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !