JeM Commandor Masood Ilyas Kashmiri : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आतंकवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील लोकांचे तुकडे तुकडे झाले !

जैश-ए-महंमदचा वरिष्ठ कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने दिली माहिती !

जैश-ए-महंमदचा वरिष्ठ कमांडर मसूद इलियास काश्मिरी आणि आतंकवादी मसूद अझहर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील आतंकवाद्यांचे तळ आणि मुख्यालय यांच्यावर आक्रमणे करून ती नष्ट केली होती. पाकने ते अधिकृतरित्या कधीही मान्य केले नाही. या आक्रमणात आतंकवादी मसूद अझहर याचे नातेवाईक ठार झाले होते. आता या संदर्भात जैश-ए-महंमदचा वरिष्ठ कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने याविषयी माहिती दिली आहे.

त्याने मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याची स्वीकृती दिली. इलियास काश्मिरी याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी म्हणजे ७ मे या दिवशी बहावलपूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील महिला आणि मुले यांचे तुकडे-तुकडे झाले. बहावलपूर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. येथे जैश-ए-महंमदचे मुख्यालय मरकझ सुभान अल्ला नावाच्या ठिकाणी आहे.