अचानक ऊन आणि उकाडा चालू झाला आहे. वाढत्या बांधकामाच्या युगात उकाड्याने सूक्ष्म धूळ परत हवेत उडू लागते आणि त्यामुळे झालेल्या संसर्गाला शरिरात वाढायला अजून जागा मिळते. यामुळेच हळूहळू घसा, सर्दी, खोकला अशा रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. त्यासह अंगाला खाज येणे, कोरडेपणा वाढणे, पोट बिघडणे अशाही तक्रारी बर्याच आहेत. यासाठी पुढील काही गोष्टी करता येतील.

१. अंगाला खोबरेल तेल लावणे चालू करावे. आधीच करत असाल तर उत्तम !
२. कोमट पाण्यात हळद घालून त्याच्या गुळण्या करणे.

३. सुंठ, ज्येष्ठमध, हळद या गोष्टी नेहमी आपल्याजवळ असाव्यात, जेणेकरून त्रास झाला असता वैद्यांशी बोलून घेता त्यांचा उपयोग करता येईल.

४. आंबट, खारट, तिखट पदार्थ पूर्ण बंद करणे. मुख्यतः चायनीज, सोया सॉस, मद्यपान, हिरवीगार तिखट मिरची असलेले पदार्थ बंद करणे.
५. तापानंतर कोरडा खोकला टिकण्याचे प्रमाण बरेच आहे. त्या दृष्टीने केवळ ‘कफ सिरप’ हे बर्यापैकी निरुपयोगी ठरते. वैद्यांच्या सल्ल्याने आधीच चाटण पुडी आणि अचानक ताप आला असता घेण्यासाठी काही औषधे आणून ठेवली असता दिवस वाया न जाता लगेच औषध चालू करता येऊ शकते.
६. लहान मुलांच्या दृष्टीने बालकांना प्रतिदिन घेता येतील आणि सर्दी, खोकला यांवर उपयोगी होतील, अशा पद्धतीचे औषध देता येते. यामुळे असलेला सर्दी, खोकला बरा होणे; सर्दी, खोकला झाला, तर अल्प प्रमाणात होणे आणि तापापर्यंत प्रकरण न जाणे अशी तिहेरी कामगिरी होते.
७. गाडीवर जातांना मुखपट्टी (मास्क) घालणे, स्वतःला लक्षणे असतांना वेगळ्या खोलीत रहाणे (आयसोलेट) या गोष्टी सजगतेने समजून आपण करायला हव्यात. ‘कोविड’ महामारीमधून बाहेर पडूनही लोकांमध्ये याविषयी सजगता बरीच न्यून दिसते. खोकत असतांना तोंडावर रूमाल धरून तोंड बाजूला नेणे किंवा आजारी असतांना आपल्या लहान मुलांपासून लांब रहाणे, सर्दी झालेल्या आई-बाबांनी स्वतःचा रूमाल मुलांना वापरायला न देणे, डॉक्टरांकडे जातांना ‘मास्क’ घालून जाणे या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. घरामध्ये आपल्या कुटुंबियांना आणि डॉक्टरांकडे जातांना तो संसर्ग नकळत आपण प्रतीक्षा कक्षातील इतर रुग्णांना, तसेच डॉक्टर अन् तेथील कर्मचारी यांना देतो, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली, तर अशाने सगळ्यांचे आरोग्य जपले जाईल.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१०.९.२०२५)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !