Ganesh Idol Immersion Mandya : ज्या मशिदीतून विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, ती बेकायदेशीर !

मद्दूरू (कर्नाटक) येथील स्थानिकांचा दावा

मंगळुरू (कर्नाटक) – मंड्या जिल्ह्यातील मद्दूरू येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी ज्या मशिदीतून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती, त्याचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. मद्दूरूच्या चन्नेगौडा येथे असलेल्या या मशिदीविषयीची तक्रार स्थानिक लोकांनी जिल्हाधिकारी, तसेच पंतप्रधान  कार्यालयाला पत्र लिहून केली होती.

मशिदीसमोरून हिंदूंच्या मिरवणुकीवर बंदी !

या मशिदीच्या समोरून हिंदूंची मिरवणूक जाऊ नये, यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर हिंदूंच्या अंत्ययात्रेच्या वेळीही ढोल वाजवण्यास बंदी घालण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. (असे व्हायला मद्दूरू भारतात आहे कि पाकिस्तानात ? हिंदूंनी याला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक ! – संपादक)

मशिदीत देशद्रोही कारवाया : स्थानिकांचा आरोप !

स्थानिक लोकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, मशिदीत मदरसा चालवला जातो आणि देशद्रोही कारवायाही चालू आहेत. रात्रीच्या वेळी काही अनोळखी व्यक्ती फिरत असतात आणि येथे बेकायदेशीर आर्थिक व्यवहारही चालू आहेत. या मशिदीचे उद्घाटन जून २०२५ मध्ये झाले होते. मशिदीच्या बांधकामाच्या वेळी स्थानिक लोकांनी हे बांधकाम बेकायदेशीरपणे चालू असल्याविषयी प्रशासनाला सूचित केले होते. असे असूनही मशिदीचे बांधकाम पूर्ण झाले आणि आता तिथे बेकायदेशीर कारवाया चालू असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

संपादकीय भूमिका

जर या दाव्यात तथ्य असेल, तर स्थानिक प्रशासकीय अधिकारी, तसेच पोलीस यांनाही विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या आक्रमणासाठी उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !