Odisha Madrassa Murder : ओडिशा येथे मदरशात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार आणि हत्या

५ अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात

भुवनेश्वर (ओडिशा) – नयागड जिल्ह्यातील निलापल्ली येथील एका मदरशात शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच ही हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मदरशातील ५ विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे.

१. मृत मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विद्यार्थ्याची हत्या मदरशाच्या बंद शौचालयात करून मृतदेह जुन्या टाकीमध्ये टाकण्यात आला.

२. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात आढळून आले की, वरच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी वारंवार लैंगिक अत्याचार करून ३१ ऑगस्ट या दिवशी अल्पवयीन विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. तो मृत असल्याचे समजून त्याला टाकीमध्ये टाकण्यात आले. तो विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवत त्याच रात्री तेथून पळून गेला.

३. २ सप्टेंबर २०२५ या दिवशी आरोपी असलेल्या २ विद्यार्थ्यांनी त्याला पुन्हा काही ना काही कारणाने बोलावले आणि आणखी ३ साथीदारांसह त्याचे पुन्हा लैंगिक शोषण केले. यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा मृतदेह त्याच टाकीमध्ये टाकला.

४. या प्रकरणी पुरावे मिळाल्यानंतर सर्व ५ अल्पवयीन आरोपींविरुद्ध ‘पॉक्सो’ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

असा प्रकार हिंदूंच्या शैक्षणिक परिसरात असा प्रकार घडला असता, तर एव्हाना ही आंतरराष्ट्रीय बातमी झाली असती आणि प्रसारमाध्यमांमध्ये घंटोन्‌घंटे चर्चेची गुर्‍हाळे चालली असती; परंतु आतापर्यंत मदरशांत अल्पवयीन मुले आणि महिला यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या सहस्रो घटना घडल्या असल्या, तरी हा विषय कधीच चर्चेचा ठरलेला नाही !