उपग्रह मोहिमांमध्ये होणार उपयोग

नवी देहली – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘सेमिकॉन इंडिया २०२५’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘विक्रम ३२०१’ ही भारताची पहिली सेमीकंडक्टर चिप सादर केली. भारताच्या सेमीकंडक्टर स्वावलंबनाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. हा ‘प्रोसेसर’ भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि चंदीगड येथील सेमीकंडक्टर प्रयोगशाळा यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.
‘विक्रम ३२०१’संदर्भात विशेष काय ?
हा ३२-बिट मायक्रोप्रोसेसर आहे, जो विशेषतः अंतराळ मोहिमांच्या कठोर परिस्थितीत काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. उणे ५५ अंश सेल्सिअस ते १२५ अंश सेल्सिअस तापमान सहन करण्याची त्याची क्षमता आहे. चिप उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांमध्ये दिशादर्शन अन् नियंत्रण व्यवस्थापन हाताळण्यासाठी बनवण्यात आली आहे. सैनिकी दर्जाच्या मानकांनुसार ती बनवण्यात आली आहे, जेणेकरून किरणोत्सर्ग आणि कंपन यांसारख्या कठीण परिस्थितीतही ती काम करत राहील.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ