मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करणार असल्याचा दावा !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने चालू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमांतर्गत २९ ऑगस्टपर्यंत शहरातील ८ प्रभागांतून ४ सहस्र ३२ मूर्तींचे संकलन केले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक ८२२, तर पीओपीच्या ३ सहस्र २१० मूर्तींचा समावेश आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र ‘मूर्ती संकलन केंद्रां’ची व्यवस्था केली आहे. मूर्ती पीओपीची आहे कि शाडू मातीची आहे ? याप्रमाणे नोंद केली जात आहे. मूर्तींचे संकलन झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जात आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येते.
पिंपरी-चिंचवड येथे श्री गणेशमूर्तींच्या पुनर्वापराची धर्मद्रोही मोहीम !
गेल्या ४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका गणेशोत्सव काळात ‘इको एक्झिस्ट फाऊंडेशन’ या संस्थेच्या साहाय्याने ‘पुनरावर्तन’ मोहीम राबवत आहे. या मोहिमेंतर्गत शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींची माती पुन्हा संकलित करून ती मूर्तीकारांपर्यंत पोचवली जाते. त्यानंतर मूर्तीकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (श्री गणेशपूजनानंतर त्या मूर्तीतील मातीचा वापर पुन्हा मूर्ती करण्यासाठी करणे, हा धर्मद्रोह आहे. असे धर्मद्रोही उपक्रम त्वरित थांबवावेत, तसेच पुनर्वापरासाठी घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्याची अनुमती देणार्या अधिकार्यांवरही कारवाई करावी असेच भाविकांना वाटते ! मागील ४ वर्षांपासून किती मूर्ती दान मिळाल्या ? किती मूर्ती विकल्या ? त्यातून मिळालेला पैसा कुठे आणि कोण वापरतो ? या सर्व गोष्टी पालिकेच्या आवाहनावर विश्वास ठेवून त्यांना पुनर्वापरासाठी मूर्तीदान करणार्या भाविकांना पालिकेने सांगणे अपेक्षित आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकामूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करणार असल्याचा दावा ! यावर कोण विश्वास ठेवणार ? श्री गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनच करायचे आहे, तर मूर्ती संकलनाचा घाट का घातला जातो ? |
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !