
मुंबई – ‘मंगलम् कापूर’ नावाच्या प्रसिद्ध आस्थापनाने त्याच्या विज्ञापनामध्ये श्रीरामाची भूमिका करणारे एक पात्र ग्राहक म्हणून दाखवून प्रभु श्रीरामाचे मानवीकरण केले आहे. यात विज्ञापनात प्रभु श्रीरामाचे पात्र बूट घालून दुकानात येते. त्यापूर्वी एक जण त्याच्या पाया पडतो. त्यानंतर ते पात्र त्या व्यक्तीला टाळी देते, तसेच त्याला आशीर्वाद देते. (केवळ स्वतःच्या उत्पादनाची विक्री वाढावी आणि जनतेत विज्ञापानाची चर्चा व्हावी, या उद्देशाने प्रभु श्रीरामाच्या पात्राचे अशा प्रकारे मानवीकरण करणे, हे चुकीचे आहे. त्यामुळे देवतेचा अवमान होतो ! – संपादक)
(वरील विज्ञापन प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. – संपादक )
१. या विज्ञापनात चित्रपटगृहाबाहेर प्रभु श्रीरामाचा वेश धारण केलेली ही व्यक्ती दाखवली आहे. हे पात्र भ्रमणभाषवर मानवाप्रमाणे ‘सेल्फी’ (स्वतःचेच छायाचित्र) काढत असतांना त्याच्या आईचा भ्रमणभाष येतो आणि आईने कापूर आणायला सांगितल्याची त्याला आठवण होते.
२. त्या वेळी सायकलचा वापर करून हे पात्र पूजासामग्री मिळणार्या दुकानात जाते. (बूट घालणे, भ्रमणभाषचा वापर करणे, सायकल वापरणे या सर्व मानवाच्या कृती देवाला करतांना दाखवणे हे योग्य नव्हे, हे हिंदूंना लक्षात येईल तो सुदिन ! – संपादक)
३. दुकानातील श्रद्धाळू मालक त्या व्यक्तीला प्रत्यक्ष ‘श्रीराम’ संबोधून ‘देवासाठी केवळ मंगलम् कापूर’ असे म्हणत इतर अन्य डबीऐवजी तिजोरीतून काढून मंगलम् कापराची मोठी डबी त्याला देतो. (या विज्ञापनातील दुकानाचा मालक प्रभु श्रीरामाची वेशभूषा केलेल्या पात्राचा मान ठेवत असला, तरी ‘देवतेचे मानवीकरण करणे म्हणजे देवतेचे विडंबनच होय’, हे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाधर्मशिक्षण आणि धर्माभिमान यांच्या अभावामुळे हिंदूंना देवतांचा वापर विज्ञापने किंवा आर्थिक लाभ यांसाठी करू नये, हे लक्षात येत नाही. अन्य धर्मियांमध्ये त्यांच्या श्रद्धास्थानाचा असा मनोरंजनात्मक वापर केलेला कधी आढळतो का ? |
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !