आज विविध न्यायालयांत काशी, मथुरा, कुतूबमिनार असे विविध खटले चालू आहेत. ताजमहाल आणि संभलच्या मंदिराचा खटला चालू आहे. या न्यायालयीन खटल्यांच्या संघर्षात मी लोकांना भेटतो, या खटल्यांविषयी लोक मला विचारतात, ‘‘काशी, मथुरा, भोजशाला मुक्त होण्यासाठी अजून केवढा वेळ लागणार आहे ?’’ मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, ‘‘तुम्ही आणि मी निर्धारित केले पाहिजे, याला केवढा वेळ लागेल.’’ वक्फ बोर्डाविषयी सर्वाेच्च न्यायालयात १०० हून अधिक खटले आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा कायदा जेव्हा संसदेत पारित झाला, तेव्हा सर्वोच्च न्यायालय विचार करते की, हा कायदा कसा थांबवला जाईल; परंतु संसदेने पारित केलेला कायदा थांबवताच येत नाही. वास्तविक नियमानुसार संसदेत झालेल्या कायद्यावर स्थगिती आणली जाऊ शकत नाही. या कायद्याला अवैध घोषित केले जाऊ शकते; मात्र हा कायदा रहित करता येत नाही. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याच्या विरोधात संपूर्ण मुसलमान समाज एकवटला. वक्फ बोर्डाच्या कायद्याविषयी जरा काही झाले, तर मुसलमान सर्वाेच्च न्यायालयापर्यंत जातात. हिंदूंवर झालेल्या अनेक आघातांविषयीचे खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यांचे निर्णय व्हायला किती वेळ लागणार ?, हे आपल्या सर्वांना निर्धारित करायचे आहे. आज देशातील व्यवस्था हिंदुविरोधी आहे. हिंदूंच्या विरोधात नकळतपणे प्रचंड कायदे निर्माण केले गेले आहेत. आपल्या विरोधात एवढे कायदे केले आहेत की, त्याचे आव्हान स्वीकारणे ही दूरची गोष्ट आहे. त्याला जाणून घ्यायचा हिंदू प्रयत्न करत नाहीत. ही मोठी विडंबना असून यातून बाहेर यायला हवे.

१. संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी असल्याने ती व्यवस्था पालटायला हवी !
हिंदूंना संघटित होऊन लढण्याची आवश्यकता आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि समाजवाद हे शब्द जोडले गेले आहेत. या विरोधात संघटित होऊन लढाई लढली पाहिजे. राज्यघटनेतील कलम २९-३० मध्ये अनेक अल्पसंख्यांकांचे अधिकार जोडले गेले. असंवैधानिक त्रुटी आहेत. ज्याचा सर्रास दुरुपयोग होत आहे. अल्पसंख्यांक आयोग असंवैधानिक आहे. त्यासाठी हिंदूंना संघटित होऊन लढण्याची आवश्यकता आहे. एका अल्पसंख्यांक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी ५० टक्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. देशातील सहस्रो अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये या जागांवर प्रवेश घेण्यासाठी लोक धर्मांतर करून प्रवेश घेत आहेत. अशा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये असे प्रकार होत आहेत. कलम ३० चा दुरुपयोग केला जात आहे. कलम २९-३० मुळे आम्हाला (हिंदूंना) अडचणी निर्माण झाल्या आहेत. मी कायद्याच्या विरोधात नाही, तर ही व्यवस्था आहे, ती हिंदूंच्या विरोधात आहे. ही व्यवस्थेची पद्धत हिंदूंच्या विरोधात आहे. सर्वाेच्च न्यायालयातील काही निकाल आहेत, ते राज्यघटनेच्या विरोधात आहेत. हिंदु समाजाच्या आत्म्यावर आघात करणारे आहेत. त्या विरोधात कुणी चर्चा करत नाही. कलम २९-३० विषयी युक्तीवाद करतांना सर्वाेच्च न्यायालयात अल्पसंख्यांकांवर पुष्कळ चर्चा केली गेली. कलम २६ प्रमाणे मशिदी, चर्च अधिग्रहणापासून सुटतात; मात्र हिंदूंची मंदिरे अधिग्रहण होतांना कलम २६ गुंडाळले जाते. शिवाचे मंदिर पाडण्याचे आदेश देतांना देहली उच्च न्यायालय म्हणते, ‘भगवान शिवाने आम्हाला क्षमा करावी !’ यातून असे लक्षात येते की, कायदे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी असल्याने ती व्यवस्था पालटायला हवी. हिंदु समाजानेही या लढ्यासाठी दबावगट निर्माण केला, तरच आपण आपली मंदिरे सुरक्षित ठेवू शकतो. त्याचसमवेत हिंदुविरोधी कायदे असल्याने हिंदूंची कुचंबणा होत आहे.

२. निधर्मी आणि समाजवाद यांची व्याख्या न्यायमूर्तींनाही व्यवस्थित ठाऊक नाही !
निधर्मी आणि समाजवाद यांची व्याख्या न्यायमूर्तींनाही व्यवस्थित ठाऊक नाही. अल्पसंख्यांक आयोग असंवैधानिक असूनही कुणीही समजून घेत नाही, ही शोकांतिका आहे. आज देहली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या घरात मोठी रक्कम सापडते; पण याविषयी एक साधी तक्रार प्रविष्ट होत नाही. ‘या प्रकरणी नियुक्ती केलेल्या चौकशी समितीने माझ्या विरोधात अहवाल दिला, तरी मी त्यागपत्र देणार नाही’, असे ते न्यायमूर्ती म्हणतात. असे न्यायमूर्ती खरा न्याय देऊ शकतील का ? असा प्रश्न पडतो. लोकांना न्याय मिळणारच नाही. असे न्यायाधीश असतील, तर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते कसे लढू शकतील ? आपले हिंदु राष्ट्र शस्त्रसंधी रोखणारे नाही, तर पाक, बांगलादेश, अफगाणिस्तानसह ‘अखंड हिंदु राष्ट्र’ निर्माण करणारे ‘सनातन राष्ट्र’ असावे. हिंदूंच्या श्रद्धास्थान केंद्रांसाठी आपण अतिशय सहिष्णु, शांत आहोत. हिंदूंची श्रद्धास्थान केंद्रे मुक्त व्हायला हवीत, अशी एकमुखी मागणी हिंदूंनी केली पाहिजे. भारत हिंदु राष्ट्र व्हायला हवे, अशी सर्वांची इच्छा आहे; मात्र या हिंदु राष्ट्राची राज्यघटना काय असणार आहे ? हिंदूंसमोर पहाडाप्रमाणे लक्ष्य उभे आहे. हिंदु राष्ट्र आणि त्याच्या राज्यघटनेविषयी बोलले, तरी राज्यघटनेला पालटू शकत नाही, असे हिंदूंना सांगितले जाईल. राज्यघटनेच्या विरोधात कितीही गोष्टी आणल्या, तरी त्या रहित केल्या जातील. आम्ही काशीविश्वनाथ, भोजशाला, संभल येथील मंदिरांविषयीची लढाई लढत आहोत. हे सर्व प्रश्न लवकर मुक्त होण्यासाठी चालू असलेल्या लढाईत सर्व हिंदूंचा थेट सहभाग असणे आवश्यक आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीचा कलंक मिटला पाहिजे, अशी मागणी हिंदूंची हवी. अल्पसंख्यांक आयोग आणि कलम २९-३० संपवायला हवे, अल्पसंख्यांकांसाठी ३ सहस्र २०० कोटी खर्चून जी योजना चालवली जात आहे, ती बंद करावी; नवीन राज्यघटना होण्यासाठी त्याची समिती स्थापन व्हावी, अशी हिंदूंची मागणी हवी.

३. काशी, मथुरासमवेत हिंदूंचे श्रद्धास्थान केंद्रेही मुक्त झाली पाहिजेत !
हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात असून ती मुक्त केली पाहिजेत. काशी, मथुरासमवेत हिंदूंच्या श्रद्धास्थानांची केंद्रेही मुक्त झाली पाहिजेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी याविषयी चालू केलेल्या मोहिमेत सर्व हिंदूंनी जोडले पाहिजे. यामध्ये भागीदार बनले पाहिजे. हे एक भव्य, दिव्य आणि पवित्र देशाला पुन्हा पालटण्याचे आध्यात्मिक कार्य आहे. हिंदूंनी अखंड हिंदु राष्ट्राची मागणी करावी, जेणेकरून तेथे शस्त्रसंधी होणार नाही. भारताच्या वतीने लढतांना आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा न होता अखंड हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी सिद्ध असले पाहिजे. आता हीच वेळ आली आहे.
४. समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मी आभार मानतो !
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात मला अनुभूती येत होती की, गोमंतकीय भूमीत हिंदु राष्ट्राचा इतिहास लिहिला जाणार आहे आणि त्याचा प्रारंभ झाला आहे. हे खरोखर संस्मरणीय आहे. समस्त हिंदु समाजाच्या वतीने आम्ही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या आदर्श नियोजनासाठी धन्यवाद देत आहोत. आम्ही वर्ष २०१३ मध्ये ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त आलो होतो. त्या वेळी मी कल्पना केलेली नव्हती की, माझे हे आंदोलन आहे आणि पुढे जाऊन ते एक भव्य विराट रूप घेईल. यातूनच पुढे हिंदु राष्ट्र साकारले जाणार आहे.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे आमच्या जीवनात मोठे पालट झाले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मी आशीर्वाद घेतले. मी त्यांना गुरु मानू लागलो. त्यांच्यामुळे आमच्या जीवनात मोठे पालट झाले आहेत. मी आणि माझे वडील पू. अधिवक्ता हरि शंकर जैन असे मानतो की, वर्ष २०१३ ते २०२५ पर्यंत प्रवासात एक नवीन ऊर्जा आम्हाला अयोध्या, काशी, मथुरा, ज्ञानवापी, संभल या न्यायालयीन प्रकरणाच्या लढाईत मिळत आहे. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांचे आम्हाला कार्यक्रमातून मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आमच्या कार्याची गती १०० टक्क्यांनी वाढली आहे. ही आमची मोठी अनुभूती आहे.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळे हिंदुत्वनिष्ठांचा लढा व्यापक झाला !
गुरूंच्या चरणी येणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे, हे वर्ष २०१३ पूर्वी नव्हते. त्यानंतर गोव्यात येऊन त्याची दिव्यता जाणून घेतली. येथे अध्यात्माची परिपूर्ण माहिती मिळते. आमचा हिंदुत्वनिष्ठांसाठीचा हा लढा आज प्रचंड व्यापक झाला आहे, तो गुरुदेवांच्या आशीर्वादामुळेच ! सनातन संस्था, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्था पुढे जाऊन मोठी आध्यात्मिक केंद्रे होतील. समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो.
७. महोत्सवाच्या कार्यक्रमातून मला चेतना मिळाली !
शंखनाद महोत्सव होत असतांना मला पुष्कळ आनंद झाला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी हा भव्य महोत्सव घेतल्याविषयी मी हिंदु समाजातील हिंदूंच्या वतीने पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करीन. अशा आध्यात्मिक पद्धतीने महोत्सवाचे आयोजन केले आहे की, यातून हिंदुत्वनिष्ठांनी शिकून घेतले पाहिजे. हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा कार्यक्रम होत असतांना त्यात एक चेतना असावी लागते, हे ३ दिवसांच्या महोत्सवातून शिकायला मिळाले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मला सहभागी होता आले, यासाठी मी कृतज्ञ आहे.
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !