
छत्रपती संभाजीनगर – हिंदुत्व हे काही भाजपचे बटीक नाही. त्यावर कुणाचा ‘कॉपीराईट’ (स्वत्वाधिकार) नाही. ती स्वतंत्र देवता आणि कल्पना आहे, त्याच्यावर सर्वांचा अधिकार आहे. भाजपचे लोक पतपेढीच्या निवडणुकीत हिंदुत्व आणत आहेत. आता सांगत आहेत की, आता ‘हिंदुत्व’च चालणार. मग आम्ही कोण आहोत ? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी भाजपचे प्रवक्ते प्रकाश बन यांच्या वक्तव्यानंतर केला आहे.
मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले की,
१. भाजपचे लोक आजही जाहीर म्हणत नाहीत की, आम्ही बाबरी मशीद पाडली. मग तुम्ही हिंदुत्वाचा दावा कसा करत आहात ? हिंदुत्वावर सर्वांचा दावा आहे.
२. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्याकडे राजकीय दृष्टीने पहाण्याची काही आवश्यकता नाही. ‘बेस्ट पतपेढी’चा निकाल आदल्या दिवशी लागला आणि दुसर्या दिवशी भेट म्हणजे विशेष काही नाही.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !