|

नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत लोकसभेचे १२० घंटे कामकाज चालणे अपेक्षित असतांना सदस्यांनी गदारोळ केल्याने कामकाज केवळ ३७ घंटे काम झाले. या अधिवेशनात लोकसभेचे ८३ घंटे कामकाजाचा कालावधी वाया गेला असून केवळ ३१ टक्के काम झाले. राज्यसभेतही १२० घंट्यांचे कामकाज होणे अपेक्षित असतांना गदारोळामुळे केवळ ४७ घंटे कामकाज झाले. खासदारांनी घातलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे ६२ टक्के वेळ वाया गेला. लोकसभा आणि राज्यसभा येथील वेळेचा अपव्यय झाल्यामुळे जनतेचे २०४ कोटी रुपये वाया गेले आहेत.
१. २४ जुलै आणि १ ऑगस्ट या दिवशी लोकसभेचे कामकाज केवळ १२ मिनिटे चालले, तर २३ जुलै या दिवशी कामकाज १८ मिनिटे चालले. ४ ऑगस्ट या दिवशी लोकसभेचे कामकाज २४ मिनिटांत स्थगित करावे लागले.
२. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ दिवस चालले. या २१ दिवसांत लोकसभा १ घंटा किंवा त्याहून अधिक काळ केवळ ५ दिवस चालली.
३. भारताच्या पहिल्या लोकसभेचे कामकाज १४ सत्रांमध्ये झाले होते. या १४ सत्रांमध्ये कामकाज ३ सहस्र ७८४ घंटे चालले. वर्ष १९७४ पर्यंत प्रत्येक लोकसभेच्या सत्रांमध्ये सततच्या बैठकांची संख्या १०० पेक्षा अधिक होती.
४. वर्ष १९७४ नंतर आणि वर्ष २०११ पर्यंत केवळ ५ वेळा सभागृहातील बैठकांची संख्या १०० पेक्षा अधिक होती.
५. पहिल्या लोकसभेत ३३३ विधेयके संमत झाली. १७ व्या लोकसभेत म्हणजेच गेल्या लोकसभेत वर्ष २०१९ ते वर्ष २०२४ या कालावधीत २२२ विधेयके संमत झाली. या वेळी जनतेसाठी महत्त्वाची विधेयके संसदेत गदारोळ असतांनाही विरोधी पक्षाच्या चर्चेविना संमत झाली.
संपादकीय भूमिका
|
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक