२० ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘आणीबाणीच्या काळात केरळमधील पोलिसांनी केलेला नक्षलवादाचा बीमोड, ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराला विरोध करणार्यांची माओवाद्यांकडून हत्या आणि भारतीय कुटुंबपद्धत नष्ट करण्याचे कारस्थान आणि अमेरिकेतील माओवादी चळवळ’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/947823.html

१. भारतातील माओवादाचा उदय आणि विस्तार
१ अ. भारतातील नेपाळ ते आंध्रप्रदेश या भागात ‘रेड कॉरिडॉर’ निर्माण करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न : माओवाद्यांकडून नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरापासून आंध्रप्रदेशातील तिरुपति येथील बालाजी मंदिरापर्यंत ‘रेड कॉरिडॉर’ (नक्षलवादग्रस्त राज्ये असलेला पट्टा) निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले. विदेशी पैशावर पोसणार्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या पाठिंब्याने माओवादी भारतात ख्रिस्ती प्रजासत्ताक स्थापन करू इच्छित होते. अशा प्रकारे माओवाद्यांच्या चळवळीने भारतात मूळ धरले.

बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते चारू मजुमदार यांनी मांडलेल्या एका संकल्पनेमुळे माओवादी किंवा नक्षलवादी यांनी भारतात, विशेषतः नेपाळ ते भारतातील आंध्रप्रदेश यांच्यामध्ये असलेल्या प्रदेशांत त्यांचे पाय भक्कम केले. सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी मजुमदारांच्या त्याच संकल्पनेला काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष यांनी पोषण देऊन बळकट केले. ख्रिस्ती मिशनरी आणि जिहादी यांचा पाठिंबा असलेल्या माओवाद्यांनी हिंदु धर्मातील शेकडो साधूंच्या हत्या केल्या.
१ आ. वर्ष १९६७ मधील बंगालमधील शेतकर्यांच्या उठावानंतर भारतात माओवादाचा उदय : बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये मार्च १९६७ मध्ये शेतकर्यांनी केलेल्या उठावानंतर भारतात माओवादाचा उदय झाला. हा उठाव नक्षलबारी या खेड्यात झाल्याने त्या चळवळीला ‘नक्षलवादी चळवळ’ असे नाव दिले गेले. या खेड्यातील लागवडीमध्ये काम करणारे कामगार माओवाद्यांनी दिलेल्या भाषणांमुळे उत्तेजित झाले आणि त्यांनी हातात तलवारी अन् कोयते घेऊन पोलिसांवर आक्रमण करून १०-१२ पोलिसांना ठार केले. साम्यवाद्यांनी त्यांना शिकवण दिली की, जर गावातील पोलीस आणि जमीनदार यांना नष्ट केले, तर क्रांती होईल आणि ते स्वतःच मालक बनतील. ‘मजुमदार आणि त्यांचे सहकारी हे कामगार अन् शेतकरी यांना देशी दारू विनामूल्य देत असत. त्यामुळे हे कामगार नेहमी भ्रमात रहात होते’, असे काही अहवाल आहेत. बाकी सगळा इतिहास आहे. ‘पीपल्स डेली’ आणि ‘रेडिओ बिजिंग’ यांच्या नेतृत्वाखाली चिनी प्रसारमाध्यमांनी भारतातील शेतकर्यांच्या या उठावाला ‘स्प्रिंग थंडर ओव्हर इंडिया’ असे नाव दिले.
२. गरीब आणि अशिक्षित यांच्या अज्ञानाचा लाभ घेऊन कोट्यधीश झालेले नक्षलवादी
या चळवळीच्या मागे असलेल्या लोकांनी ‘बफेलो सोल्जर इन हार्ट ऑफ अमेरिका’ वगैरे गाण्यांनी युवकांना आकर्षित केले. हे गाणे जमैका (उत्तर अमेरिका खंडातील बेट असलेला एक देश) येथे जन्मलेल्या बॉब मर्ली या गायकाने गायले होते, ज्याला गांजा आणि अफू यांचे व्यसन होते. मर्ली याच्या जीवनशैलीचे अनुकरण करण्यात भारतातील तरुणांना कोणताच संकोच वाटला नाही. ज्या राज्यांमध्ये साम्यवाद्यांचे प्रमाण अधिक होते, तेथे नक्षलवादी चळवळ अधिक प्रमाणात पसरली. जेव्हा नक्षलबारी येथील मार्क्स-लेनिनवादी तत्त्वज्ञानामुळे आपली शक्ती न्यून होत आहे, हे मार्क्सवाद्यांच्या लक्षात आले, त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सहस्रो कामगार पक्ष सोडून मार्क्स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. मार्क्स-लेनिनवादी पक्षाचे नेते ज्यांना ‘माओवादी’ म्हटले गेले, ते जलद पैसे कमवू इच्छित होते. त्यांनी जमीनदार आणि श्रीमंत उद्योजक यांना लक्ष्य केले. त्याचप्रमाणे विद्यापिठांना मार्क्स-लेनिन तत्त्वज्ञानाची प्रजनन केंद्र बनवण्यात त्यांना यश आले.
कोणतेही श्रम न करता ऐषोरामी जीवन जगण्याची इच्छा असलेल्या बुद्धीमान वर्गाने गरीब कामगारांना अक्षरशः गुलाम बनवले. चहाच्या मळ्यांमध्ये काम करणार्या या अशिक्षित आणि गरीब कामगाराला तो कोणत्या देशात रहातो, हे कसे समजणार ? त्या कामगारांच्या दृष्टीने ज्या भूमीत ते काम करत होते किंवा रहात होते, तोच त्यांचा देश होता. कामगारांच्या याच अज्ञानाचा लाभ माओवाद्यांनी घेतला आणि ते कोट्यधीश झाले.
३. समाजातील सर्व घटकांमध्ये माओवाद्यांचा शिरकाव
३ अ. सामान्य नागरिकांनीही ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल राईट्स अँड डेमोक्रेटिक राईट्स’सारख्या संघटनांना पाठिंबा दिला. माओवाद्यांनी देशातील सैन्य, नौदल आणि वायूदल यांसह समाजातील सर्व घटकांमध्ये शिरकाव केला. भारताचे अणूविकासाचे केंद्र असलेल्या ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये तरुण माओवाद्यांची भरती करण्यासाठी हे माओवादी नेते गुप्तपणे प्रयत्न करत असत.
३ आ. काँग्रेसचे नेते निवडणुकीत जिंकण्यासाठी माओवाद्यांवर अवलंबून असल्याने या लाल आतंकवाद्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात या नेत्यांचा पुष्कळ सहभाग होता. माओवाद्यांनी इंचभर भूमी मागितल्यावर अनेक एकर भूमी दिली जात असे. या माओ आतंकवाद्यांनी संपूर्ण भारतात त्यांचे जाळे पसरवल्यानंतर सहस्रो गरीब लोक त्यांच्या गोळ्यांमुळे मारले गेले. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, बिहार आणि दक्षिण भारतातील काही भाग माओवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनला. त्यांचे अस्तित्व किंवा आदेश यांना ज्यांनी आव्हान दिले, त्यांच्या हत्या अन्यांमध्ये दहशत बसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी करण्यात आल्या.

४. माओवाद्यांच्या आतंकी कृत्यांना समर्थन आणि देशाच्या विकासाला खीळ घालणारे तथाकथित विचारवंत
माओवाद्यांना पाठिंबा देणारे काही लोक वैचारिक वर्गातील आहेत. अरुंधती रॉय यांनी सनातन धर्माविषयी गरळओक करून ‘माओवादी हे ‘एके ४७’ हातात घेतलेले गांधीवादी आहेत’, असे घोषित केले. अरुंधती रॉय यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावरून माओवाद्यांचे समर्थन केले आहे. मेधा पाटकर यांच्या साहाय्याने त्यांनी समाजात दहशतीचे राज्य निर्माण केले. या दोघींनी नर्मदा नदीवर होणार्या सरदार सरोवर धरणाच्या बांधकामाला विरोध करणार्या आंदोलनाचे नेतृत्व केले. रॉय-पाटकर या जोडीने चर्च आणि माओवादी यांच्या साहाय्याने सरदार सरोवर धरण बांधकामाला विरोध करतांना त्यांच्या भात्यातील सर्व बाण वापरले अन् सरदार सरोवराची सत्यता लोकांना समजू नये, यासाठी त्याविषयी वेगळे चित्र उभे केले.
या धरणाचे काम वर्ष १९८७ मध्ये चालू झाले आणि ३० वर्षांनी, म्हणजे वर्ष २०१७ मध्ये हे धरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरणाचे लोकार्पण केले. या धरणामुळे आता कच्छ आणि सौराष्ट्र हा भाग हिरवागार झाला आहे. हे जगातील दुसर्या क्रमांकाचे मोठे धरण असून त्याची लांबी १ सहस्र २१० मीटर आणि उंची १३८.६ मीटर आहे. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, ऊर्जानिर्मिती आणि सर्वांत अधिक महत्त्वाचे, म्हणजे देशाची सुरक्षितता या सर्व क्षेत्रांतील विकासाला खीळ घालण्यासाठी हे नक्षलवादी आघाडीवर आहेत.
हिंदु धर्माच्या विरोधात प्रचार करणारा ऑस्ट्रेलियाचा मिशनरी ग्रॅहाम स्टेन्स

ग्रॅहाम स्टेन्स हा ऑस्ट्रेलियाचा मिशनरी ‘ओडिशामध्ये कुष्ठरोग्यांसाठी काम करतो’, असा दावा करत होता. तो प्रभावीपणे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होता आणि भारतातील ख्रिस्ती धर्म न पोचलेल्या भागांत जाणे, ही त्याची मोहीम होती. ओडिशामधील मयूरभंज येथून त्याने ऑस्ट्रेलियातील ‘टायडींग्ज’ या ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्या मासिकाला पाठवलेल्या माहितीतून आतापर्यंत माहिती नसलेली त्याने केलेली घातक कृत्ये समोर येतात. कसून अन्वेषण केल्यास मयूरभंज येथे दाट जंगलात झालेल्या ‘जंगल फेअर’मध्ये स्टेन्स यांचा जळून मृत्यू का झाला ? याचे सत्य बाहेर येईल.
माओवादी, ख्रिस्ती धर्माेपदेशक आणि जिहादी यांनी चालवलेला भारताचा सांस्कृतिक विध्वंस
माओवादी आणि ख्रिस्ती धर्माेपदेशक यांच्या वाईट कृत्यांना आता जिहादींची साथ मिळाल्याने ती अजून बळकट झाली आहेत. मार्क्सवादी, माओवादी आणि मुल्ला हे ‘बलात्कार करणे, हा उत्सव आहे’, असे समजणार्या जगातील ‘हमास’ या सर्वांत भयानक आतंकवादी संघटनेची स्तुती करत आहेत. भारताचे तुकडे व्हावेत, यासाठी मार्क्सवादी, माओवादी आणि मुल्ला हे अनेक युक्त्या वापरत आहेत. ख्रिस्ती धर्माेपदेशकांना भारतात ख्रिस्ती प्रजासत्ताक स्थापन करायचे आहे, तर मार्क्सवादी, माओवादी आणि मुल्ला हे वेगळे देश सिद्ध करण्यामध्ये गुंतले आहेत. या राष्ट्रविरोधी शक्तींनी घडवलेला सांस्कृतिक विध्वंस हा भारताच्या आत्म्याला पीडा देणार्या कर्करोगाप्रमाणे आहे.
या दुष्ट शक्तींच्या कार्य करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला, तर कितीतरी गोष्टी लक्षात येतील. समाजात खोलवर रूजलेल्या कटाचा ‘शहरी नक्षलवादी’ हा एक भाग आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अन् काँग्रेस या पक्षांच्या विद्यार्थी शाखेसारख्या संघटना त्यांना अमली पदार्थ, खर्चासाठी पैसा आणि विनामूल्य लैंगिक संबंध पुरवत असल्याने त्यांना बळकटी मिळाली आहे. यावर एकच उपाय म्हणजे या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
– श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ. (१५.७.२०२५)
५. माओवाद्यांचा लोकांचा पाठिंबा राखण्यासाठीचे प्रयत्न चालूच…
अद्यापही भारतातील नद्यांना जाेडण्याच्या एका प्रकल्पाला माओवादी विरोध करत असल्याने तो प्रलंबित आहे. ब्रह्मपुत्रा, यमुना, कृष्णा, गोदावरी आणि महानदी यांच्या पुराचे पाणी अरबी समुद्र अन् बंगालचा उपसागर यांमध्ये जाणारे पाणी हे पाण्याचा तुटवडा असलेल्या भागांत कालव्यांद्वारे वळवता येईल. यामुळे शेतकर्यांना वर्षाला ३ पिके घेता येतील आणि अधिक भाग लागवडीखाली येऊ शकतो; परंतु माओवादी असे होऊ देणार नाहीत; कारण त्यांना ‘लोकांकडून असलेला पाठींबा जाईल’, याची भीती वाटते. जर दुष्काळ आणि अन्न तुटवडा या समस्या सोडल्या, तर या लाल आतंकवाद्यांना त्यांच्या बैठका अन् आंदोलने यांसाठी लोक मिळणारच नाहीत. झारखंड, छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये माओवाद्यांच्या आतंकवादामुळे पायाभूत विकास ठप्प झाला आहे.
६. संपूर्ण जगात अपयशी ठरलेले माओवाद्यांचे तत्त्वज्ञान !
माओवाद्यांना मार्क्सवादी कम्युनिस्टांप्रमाणे आर्थिक किंवा सामाजिक विचारसरणी नाही. ‘लोक गरीब आणि भुकेले असावेत’, अशी त्यांची इच्छा आहे; कारण त्यामुळे त्यांना हुकूमशाही चालवता येते. जगात साम्यवाद्यांची विचारसरणी आता संग्रहालयातील शोभेच्या वस्तूंप्रमाणे झाली आहे. ‘युनियन ऑफ सोव्हिएत सोशेलिस्ट रिपब्लिक’ हे जवळजवळ अटलांटिक महासागरात बुडल्याप्रमाणे आहे. रशियाचा भाग असलेली सोव्हिएत प्रजासत्ताक रशियापासून वेगळी होऊ अनेक देश निर्माण झाले. झेकोस्लोव्हिया, रोमानिया, अल्बेनिया, क्युबा वगैरे देशांमध्ये असलेली साम्यवादी पक्षांची सत्ता जाऊन ते देश भांडवलशाही देश झाले आहेत. उत्तर कोरिया या एकाच देशामध्ये साम्यवादी शासनकर्ता आहे; परंतु तोही आता विघटनाच्या स्थितीत आहे.
(समाप्त)
श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ. (१५.७.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !