नक्षलवाद्यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांचा भारतावर झालेला परिणाम !

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी २५ जून १९७५ या दिवशी भारतात आणीबाणी घोषित केल्याचा स्मृतीदिन हा एक वार्षिक विधी ठरला आहे. नवीन पिढीतील युवकांना भारताच्या अंतर्गत घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळातील नागरिकांचे हक्क, बोलण्याचे आणि विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य यांचा गळा दाबणारी २ काळी वर्षे ठाऊक नाहीत. भारतातील अनेक समाजवादी पक्षांपैकी एका पक्षाचे नेते राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवरील न्यायालयाचा निर्णय उलथवून टाकण्यासाठी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली.

न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी ही याचिका ऐकल्यानंतर इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७१ मधील लोकसभा निवडणुकीत स्वतःचे अधिकृत पद आणि सरकारी यंत्रणा यांचा दुरुपयोग केल्याच्या कारणावरून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान पदावरून पदच्युत केले अन् पुढील ६ वर्षांसाठी त्यांचे संसदेत सदस्यत्व रहित केले. जेव्हा वर्ष १९७७ मध्ये लोकांना सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संधी मिळाली, तेव्हा आतापर्यंत झाला नव्हता तेवढा काँग्रेस पक्षाचा पुष्कळ मोठा पराभव झाला.

१. आणीबाणीच्या काळात केरळमधील पोलिसांनी केलेला नक्षलवादाचा बीमोड

असे असले, तरी केरळ राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल धक्कादायक होता; कारण या निवडणुकीत काँग्रेस आणि तिच्याशी युती केलेले पक्ष यांनी राज्यातील सर्व २० जागा जिंकल्या होत्या. आणीबाणीच्या या काळ्या दिवसांत विरोधी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना कारावास भोगावा लागला. काही जणांना पोलिसांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागले; परंतु या काळात केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने मात्र तेथील नक्षलवादी चळवळ मोडून काढली.

केरळमधील तरुण भारतीय पोलीस सेवा अधिकारी जयराम पडीक्कल जे पुढे वयाच्या २९ व्या वर्षी उपमहानिरीक्षक झाले, त्यांनी हे शक्य करून दाखवले. नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्या वेळी काँग्रेसचे नेते आणि केरळचे गृहमंत्री के. करुणाकरन् यांनी पडीक्कल यांना कारवाई करण्यासंबंधी ‘कोरा धनादेश’ दिला आणि या अधिकार्‍यानेही मंत्र्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्या वेळी नक्षलवादी म्हणून संबोधल्या जाणार्‍या सर्व नक्षलवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणार्‍यांना पडीक्कल यांनी नष्ट केले.

श्री. कुमार चेल्लपन

१ अ. ८ वर्षे माओवाद्यांकडून केरळमधील जमीनदारांच्या हत्या आणि पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात माओवाद्यांनी उभारलेली मोहिम : वर्ष १९६८ ते १९७५ या कालावधीमध्ये केरळमध्ये भीषण हत्या झाल्या, ज्यांचा संबंध माओवाद्यांशी होता. ‘जमीनदारांच्या हत्या करून जमीनदारी पद्धतीचा पूर्ण विध्वंस करू’, असा दावा माओवादी करत होते. यामध्ये माओवाद्यांनी काळजीपूर्वक त्यांचे लक्ष्य ठरवले होते. ‘त्यांच्या हिंसाचाराला हिंदु सामोरे गेले होते, तेसुद्धा ‘मेनन’ आणि ‘नायर’ अशा उच्चभ्रू जातीतील होते’, हे त्या वेळी नागरिकांच्या लक्षात आले नाही. पडीक्कल आणि त्यांचे साथीदार यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे केरळमधील राखीव जंगलांतून माओवाद्यांना पळून जावे लागले; परंतु माओवादी आणि मार्क्सवादी यांनी ख्रिस्ती धर्माेपदेशकांच्या सक्रीय पाठिंब्याने पडीक्कल यांच्या विरोधात प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोहीम उभारली. ‘भ्रष्टाचारी, क्रूर’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली. पडीक्कल यांच्या विरोधात ज्या खळबळजनक बातम्या पसरवल्या त्यापासून सत्य कित्येक प्रकाशवर्षे लांब होते.

२. माओवाद्यांशी युती करून सनातन धर्माच्या विरोधात प्रचार करणारे ख्रिस्ती धर्माेपदेशक

‘भारतावर प्रभाव टाकण्यात माओवाद्यांना आलेले अपयश हे सनातन धर्मामुळे आहे’, असे ते मानतात. स्टेन सेमी, जॉन दयाळ आणि त्यांची मुलगी करुणा दयाळ अन् ब्रदर पॉल दिनकरन् हे सर्व जण सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अधिक वेळ काम करत आहेत. अनेक ‘सॅटेलाईट’द्वारे दूरदर्शन वाहिन्यांवर २४ घंटे ‘मिरॅकल प्रेअर मिटींग्ज’  नावाचे ख्रिस्ती धर्मप्रसाराचे हे कार्यक्रम भारतात प्रक्षेपित होत असतात. हे ख्रिस्ती धर्माेपदेशक आणि ख्रिस्ती मिशनरी यांनी सनातन धर्म अन् हिंदूंची मंदिरे संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी माओवाद्यांशी युती केली आहे.

भारतीय कुटुंबपद्धत नष्ट करण्याचे कारस्थान आणि अमेरिकेतील माओवादी चळवळ

१. भारतीय कुटुंबपद्धत २. अमेरिकेतील माओवादी चळवळीचे रेखाचित्र

माओवादी प्रचार करत असलेली आर्थिक आणि सामाजिक विचारसरणी, ही भारतीय ज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये शिकवण्यात येणार्‍या विचारसरणीची प्रतिकृती होती; परंतु माओवादी भारतातील कुटुंबपद्धतीच्या विरोधात आहेत. सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी त्यांना पवित्र अशी कुटुंबव्यवस्था नष्ट करून भारताचे रूपांतर बाप नसलेल्या समाजामध्ये करायचे आहे. वर्ष १९९५ मध्ये डेव्हिड ब्लँकेनहॉर्न या सामाजिक शास्त्रज्ञाने ‘फादरलेस अमेरिका’ हे पुस्तक लिहिले. यामध्ये त्याने लिहिले की, अमेरिकेत जन्मलेल्या ४० टक्के मुलांना त्यांचा बाप कोण आहे ? हे ठाऊक नसते. अमेरिकेतील धोरणे ठरवणार्‍यांसाठी हाच मुख्य काळ होता, जोपर्यंत डॉनल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर आले, तोपर्यंत अमेरिकेत ‘बाप ठाऊक नसणे’, ही मुख्य साथ आली, जिने देशाची कमाई गिळून टाकली. या आपत्तीविषयी ट्रम्प यांनी लोकांना चेतावणी दिली; कारण अवैधपणे अमेरिकेत आलेली, बाप नसलेली मुले आणि कुटुंबे यांनी अमेरिकेतील दुर्मिळ राष्ट्रीय स्रोत खाल्ले. आता ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसर्‍या कार्यकाळात ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान बनवा), अशी घोषणा केली आहे. एकेकाळी जगातील सर्वांत समृद्ध आणि बलवान राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या पायाखालची भूमी सरकत आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. अमेरिकेत माओवादी वेगळ्या नावाने कार्यरत आहेत आणि ही स्थिती भारतातील धोरण ठरवणार्‍यांसाठी चेतावणी आहे.
– श्री. कुमार चेल्लपन

३. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराला विरोध करणार्‍यांची माओवाद्यांकडून हत्या

ओडिशामधील कंधमल येथे माओवाद्यांनी आदिवासींचे धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांना विरोध करणार्‍या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची डोक्यात गोळी घालून हत्या केली, हे किती जणांना आठवते ? विनोद चौबे हा प्रामाणिक भारतीय पोलीस अधिकारी छत्तीसगडमध्ये उपायुक्त होता. त्याने कोणतीही तडजोड न करता ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात पवित्रा घेतल्यावर माओवाद्यांनी एक वैद्यकीय अधिकारी आणि त्याचे साथीदार यांच्या साहाय्याने त्याची हत्या केली.

नुकतेच ‘हिंदु शक्ती’ ही संघटना एका जोडप्याला एका गुन्ह्याच्या प्रकरणी खोटेपणाने गुंतवत आहे’, असा कांगावा काही स्वयंसेवी आणि ख्रिस्ती धर्मप्रचार करणार्‍या संघटना यांनी केला. त्यानंतर या जोडप्याची कारागृहातून सुटका करण्यात आली. या प्रकरणात भारतातील न्यायव्यवस्थेवर दबाव आणला गेला. या खटल्यात फिर्यादी पक्ष कमकुवत असल्याने या जोडप्याची कारागृहातून सुटका झाली आणि त्यांच्यापैकी एक जण पुढे अंतोनिओ माईनो यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचा सदस्य बनला.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ. (१५.७.२०२५)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/948083.html