निरोगी जीवनासाठी व्यायाम
‘आतापर्यंत आपल्याला ‘व्यायाम हे शरिराचे बळ, लवचिकता आणि कार्यक्षमता वाढवणे यांसाठी असते’, हे ठाऊक झाले आहे. या लेखात ‘शरिराला घाम काढायला लावणारा व्यायाम हा केवळ हृदयासाठी किंवा वजनासाठी नाही, तर तुमच्या त्वचेसाठी एक अद्भुत औषध कसा आहे ? व्यायामामुळे त्वचा कशी सुधारते ? काय वैज्ञानिक आधार आहे आणि कोणत्या सवयी त्वचेचे रक्षण करतील ?’, यांविषयी जाणून घेऊया.
लेखांक क्रमांक ७८

१. व्यायामामुळे चेहरा उजळ आणि तेजस्वी दिसणे
व्यायाम केल्यावर हृदयाचे ठोके वाढतात आणि त्वचेला अधिक प्रमाणात रक्तपुरवठा होतो. यामुळे बर्याच त्वचाविकारांना कारणीभूत असलेले शरिरातील वाईट घटक, म्हणजेच ‘टॉक्सिन्स’ (शरिरासाठी हानीकारक असलेली विषारी द्रव्ये) आणि ‘फ्री रॅडिकल्स’ (शरिरात निर्माण होणारे अस्थिर अणू) बाहेर टाकले जातात. त्यासह त्वचेला प्राणवायू आणि पोषकद्रव्ये अधिक प्रमाणात मिळतात. परिणामी चेहर्यावर नैसर्गिक तेज दिसू लागते आणि चेहरा उजळ अन् तेजस्वी दिसतो.

२. व्यायाम केल्यामुळे त्वचेचे शुद्धीकरण होणे
व्यामाम केल्यामुळे शरिरात उष्णता निर्माण होऊन अंगातून घाम बाहेर येतो. घामाच्या माध्यमातून त्वचेतील घाण, धूळ, तेल आणि बॅक्टेरिया (सूक्ष्म एक पेशीय हानीकारक जीव) बाहेर पडतात. व्यायाम केल्यावर स्नान करावे. अशा प्रकारे व्यायाम केल्यामुळे त्वचेचे शुद्धीकरण होते.
३. व्यायामामुळे त्वचारोग न्यून होणे
तणावामुळे शरिरात ‘कॉर्टिसॉल’ संप्रेरक (हार्माेन्स) वाढते. त्यामुळे त्वचेवर पुळ्या येणे, त्वचा कोरडी पडणे, सोरायसिस, एक्झिमा आदी त्वचारोग होतात. याउलट नियमित व्यायाम केल्याने मेंदूतील ‘सेरोटोनिन’ संप्रेरक वाढते. त्यामुळे तणाव न्यून होतो आणि इतर संप्रेरके संतुलित रहातात अन् त्वचेच्या समस्याही न्यून होतात.
४. व्यायामामुळे त्वचा घट्ट, लवचिक आणि तजेलदार रहाणे
‘कोलॅजेन’ नावाचे प्रथिन त्वचेला घट्ट, लवचिक आणि तजेलदार ठेवते. व्यायाम केल्यावर ‘कोलॅजेन’साठी आवश्यक पोषकतत्त्वे त्वचेत पोचतात. यासह शारीरिक वाढ करणार्या संप्रेरकाचा स्राव वाढतो. त्यामुळे त्वचेला सुरकुत्या न पडता ती घट्ट आणि तजेलदार दिसते.’
(क्रमशः पुढच्या बुधवारी)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.६.२०२५)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/950655.html
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !