हत्येचा प्रयत्न करणार्‍याला जन्मठेपेसह १ लाख ५० सहस्र रुपयांचा दंड !

सातारा, १६ ऑगस्ट (वार्ता.) – जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने अभिजीत अशोक शिंदे यांना जन्मठेपेसह १ लाख ५० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अभिजीत शिंदे यांनी तक्रारदारांच्या पुतणीची छेड काढली होती. याविषयी जाब विचारण्यासाठी गेले असता अभिजित शिंदे आणि त्यांच्या भावंडांनी तक्रारदारांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते.

या वेळी भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांवरही शिंदे यांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर घायाळ केले होते. परिस्थितीजन्य पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षीवरून न्यायाधीश तांबोळी यांनी शिंदे यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.