|

पुणे – अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट या दिवशी १२ वर्षे पूर्ण होणार आहेत. या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली असली, तरी ‘सूत्रधार’ अजूनही मोकाट आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी आणि अनिल वेल्हाळ यांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर जादूटोणाविरोधी कायदा करण्याची मागणी केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे, त्याविषयी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही. ही अक्षम्य दिरंगाई आहे, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिकादाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळेच या हत्येचे अन्वेषण भरकटलेले आहे, त्यामुळे खरेतर त्यांचीच चौकशी होणे आवश्यक आहे ! |
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !