हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ

रायगड – राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन, तसेच शाळा, महाविद्यालयांत निवेदने देण्यात आली. यात समितीच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.
समितीच्या वतीने खोपोली आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत निवेदने देण्यात आली. याप्रमाणे खालापूर तहसीलदार कार्यालय, गटशिक्षण अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती व्हावी, यासाठी समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील अलिबागसह एकूण १६ शाळा-महाविद्यालयांत निवेदने देण्यात आली आहेत.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !