
भारताचे वायूदलप्रमुख (एअर चीफ मार्शल) ए.पी. सिंह आणि सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकच्या उडवलेल्या दाणादाणाची अधिकृतरित्या विस्तृत माहिती दिल्यानंतर पाकचे ‘स्वयंघोषित’ फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन भारताला अप्रत्यक्ष अणूयुद्धाची धमकी दिली. ‘पहलगाम येथील आक्रमणापासून चालू झालेले हे प्रकरण अद्याप थांबलेले नाही. ‘याचा शेवट पाकच्या विनाशात होणार’, असे जर आता म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. पाकची मानसिकता पहाता आता त्याचे दिवस भरले आहेत आणि काळ अन् वेळ समीप आली आहे. भारताच्या विरोधात अमेरिका पाकचा वापर करू लागला आहे. याचा परिणाम पाकचा विनाश होणार, हे त्याने लक्षात ठेवायला हवे. डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा आल्यानंतर त्यांचे भारताशी मैत्रीचे संबंध रहातील, असे वाटले होते; मात्र ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत, हे विसरून ते उद्योगपती आहेत आणि त्याच मानसिकतेतून आता अमेरिकेचा कारभार करू लागल्याने ‘ट्रम्प अमेरिकेला बुडवायला लागले आहेत’, असे अन्य देशांकडून नाही, तर अमेरिकी तज्ञ आणि त्यांचे समर्थकही म्हणू लागले आहेत. एकीकडे मुनीर म्हणतात, ‘आम्ही बुडू लागल्यास इतरांनाही घेऊन बुडू’, तर ट्रम्पही तेच करत आहेत. स्वतःही बुडणार आहेत आणि पाक अन् अन्य देशांनाही घेऊन बुडणार आहेत. हा काळाचा न्याय म्हणावा लागणार आहे. ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते, तेव्हा काही ज्योतिषांनी दावा केला होता की, ते अमेरिकेचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष ठरतील, त्यांच्यानंतर अमेरिकेत कुणीच राष्ट्राध्यक्ष होणार नाही. याचा दुसरा अर्थ एकतर ही व्यवस्था नष्ट होईल किंवा अमेरिका तरी नष्ट होईल. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ते झाले नाही; मात्र दुसर्या कार्यकाळात ते होऊ शकते, अशीच आताची परिस्थिती पाहून ठामपणे वाटू लागले आहे. ट्रम्प यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पाकला पुन्हा कडेवर घेतल्यानंतर पाकचे फील्ड मार्शल मुनीर यांनाही अंगावर मणभर मांस चढल्यासारखे झाले आहे. त्यातूनच ते अणूयुद्धाची धमकी देऊ लागले आहेत. यावर ट्रम्प किंवा त्यांच्या प्रशासनाने अद्याप कोणतेही विधान केले नसेल, तरी ते मुनीर आणि पाकलाच पाठीशी घालणार, यात शंका नाही. मुनीर यांच्या विधानावर पाकच्या नागरिकांच्या प्रतिक्रियाही पहाव्या लागणार आहेत; कारण त्यांना पाकच्या सैन्याची वस्तूस्थिती ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर लक्षात आलेली आहे आणि मुनीर यांची हुकूमशाहीकडे होत असलेली वाटचालही समजत आहे. सध्या पाकची स्थिती भिकार्याची आहे. पाकचे नागरिक देश सोडत आहेत. राजकारणी आणि सैन्याधिकारी यांनी आधीच परदेशात मालमत्ता बनवून ठेवली आहे. पाकमध्ये कधीही अराजक होऊ शकते आणि त्या वेळी हे सर्व जण पाक सोडून विदेशात पळून जाणार आहेत. हे संपूर्ण पाकला ठाऊक आहे. त्यातूनच मुनीर म्हणत आहेत, ‘आम्हाला कुणी बुडवले, तर आम्ही अर्ध्या जगाला बुडवू !’

गांधी-नेहरू यांचा ‘पाक’ संपवण्याची सुवर्णसंधी !
जगात जो काही आतंकवाद चालतो, त्यात कुठे ना कुठे पाकिस्तानी असल्याचे सापडते, म्हणजे पाक आधीच जगाला आतंकवादाच्या माध्यमातून बुडवत आहे. भारत गेली ३५ वर्षे याचे परिणाम भोगत आहे आणि ते अद्याप संपलेले नाहीत. काश्मीरला त्याने भारतापासून वेगळे पाडण्यात यश मिळवलेच आहे. थेट युद्धात पाक भारतासमोर कधीच टिकू शकत नाही, हे ठाऊक असल्याने तो आतंकवादाच्या माध्यमातून कारवाया करत आला आहे. आता भारत ते सहन करणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर तो बुडवण्याची भाषा करू लागला आहे. पाककडे सध्या १७० अणूबाँब आहेत, तर भारताकडे १८० आहेत. पाकने ‘पहिल्यांदा वापर करणार नाही’, असा कोणताही करार किंवा बंधन स्वतःवर घातलेले नसल्याने तो कधीही अणूबाँबचा वापर करू शकतो, तर भारताने स्वतःवर आधी बंधन घातले होते; मात्र ते हटवले आहे. त्यामुळे पाकला भारत ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देणार हे नक्कीच. पाकने अणूबाँब टाकण्याचा प्रयत्न केला, तर भारताची हवाई संरक्षण यंत्रणा त्यांना हवेतच उद्ध्वस्त करू शकते, इतकी क्षमता सध्या आहे. पाककडे तशी काही यंत्रणा नाही. त्यामुळे तो बुडणार, नष्ट होणार, यात पाक नागरिकांमध्येही दुमत नसेल; पण यात भारताचीही हानी होऊ शकते, हे गृहीत धरावे लागले. ‘पाकिस्तान केवळ भारतावर अणूबाँब टाकेल’, असे म्हणता येणार नाही. मुनीर यांनी म्हटले, ‘ते अर्ध्या जगाला बुडवतील’, म्हणजेच पाक त्याच्याकडील अणूबाँब इराण किंवा अन्य इस्लामी देश यांना देऊ शकतो. साहजिकच ते देश याचा वापर इस्रायलच्या विरोधात करतील. यानंतर इस्रायल या देशांवर अणूबाँब टाकून त्यांना नष्ट करील. मध्य-पूर्व आणि आखातातील देशांचा विनाश अटळ असेल. याचा विचार करता भारत आणि इस्रायल यांनी मिळून पाकमधील अण्वस्त्रांची ठिकाणे आताच नष्ट करणे आवश्यक ठरते; मात्र असे करण्यास ट्रम्प सध्या तरी अनुमती देणार नाहीत, हेही स्पष्ट आहे. भारत पाकवर मात करण्याच्या स्थितीत असतांना ट्रम्प यांनी मध्येच ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवल्याने भारतियांनाही ते चुकीचे वाटले. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यामागे भारताने केलेल्या आक्रमणात पाकच्या अणूकेंद्रात गळती झाल्याचा दावा केला जात आहे. यामुळेच अमेरिकेने मध्यस्थी करत युद्ध थांबवण्यास भारताला भाग पाडल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे ‘ट्रम्प यांनी नकार दिला, तर इस्रायल अमेरिकेच्या शब्दाच्या पलीकडे जाईल का ?’, हा प्रश्न आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यातील मैत्री अन् इस्रायलची संरक्षणाची भूमिका पहाता, असा निर्णय घेण्यास नेतान्याहू सिद्ध होतील, अशी अपेक्षा वाटली, तर ते चुकीचे ठरू नये. जनता पक्षाच्या राजवटीत इस्रायलने पाकचे अणू प्रकल्प नष्ट करण्यासाठी भारताकडे साहाय्य मागितले होते; मात्र तत्कालीन सरकारने त्याला अनुमती न दिल्याने आज त्याचा परिणाम, म्हणजे पाकने अणूयुद्धाची धमकी देणे होय. ४५ वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारण्याची संधी भारत आणि इस्रायल यांना आता मुनीर यांच्या विधानावरून मिळालेली आहे. ती त्यांनी उचलणे आवश्यक आहे, असे भारतीय आणि इस्रायली नागरिक यांना वाटते. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांचा विरोध असतांनाही काही गोष्टी केलेल्या आहेत आणि भारत सध्या आयात शुल्कावरून ट्रम्प यांना विरोध करत आहेच. हे पहाता मुनीर यांना जगाला बुडवण्याआधीच त्याला पुरते बुडवणे, हे जगाच्या हिताचे ठरणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार करण्याऐवजी भारताच्या संरक्षणाचा येथे विचार झाला पाहिजे. असे केल्यास भारतच नव्हे, तर जगाच्या इतिहासात पंतप्रधान मोदी यांचे नाव अजरामर होईल. नेहरू आणि गांधी यांनी करून ठेवलेला ‘पाक’ नष्ट करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
| पाकला ‘स्वतः बुडू लागल्यावर इतरांना बुडवू शकतो’, हा त्याचा दावा किती हास्यास्पद आहे, हे प्रत्यक्षात करून दाखवण्याची वेळ आली आहे ! |
संपादकीय : तथाकथित झुरळांचा उच्छाद !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump