
सांगली, २ ऑगस्ट – कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमाने समृद्ध झालेल्या हरिपूर या गावाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा उपक्रम ३० जुलैला अत्यंत उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात पार पडला. ‘संयोग चॅरिटेबल ट्रस्ट’ने या ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे संयोजन केले होते. ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी हरिपूर या गावाचा, तसेच तेथील श्री संगमेश्वर या देवस्थानाचा इतिहास मांडला. नाट्यआचार्य गोविंद बल्लाळ देवल, प्रख्यात कवी अशोकजी परांजपे, वैद्यराज गणेश पांडुरंग परांजपे यांच्या कार्यकर्तृत्वाचाही आलेख या वेळी मांडण्यात आला.
लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी झालेल्या सशस्र लढ्याची माहिती हुतात्मा स्मारकाला साक्षी ठेऊन उपस्थितांना देण्यात आली. हरिपूर येथील श्रीमती कोंडाबाई साळुंखे विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी या प्रसंगी उपस्थित होत्या. शिक्षक विठ्ठल मोहिते यांनीही हरिपूरविषयी माहिती दिली. संयोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद गाडगीळ यांनी हेरिटेज वॉक या उपक्रमाविषयी माहिती दिली. हरिपूरच्या सरपंच सौ. राजश्री तांबवेकर, संध्या बोंद्रे, संदीप सोले, सुधा भोगले, आरती लिमये यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !