
तिरुपती (आंध्रप्रदेश) – १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. हा महोत्सव पार पडावा, यासाठी मे मासामध्ये सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तिरुपती येथील श्री बालाजीच्या चरणी महोत्सवाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली आणि महोत्सवाला उपस्थित रहाण्यासह या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे अडथळे न येण्याविषयी प्रार्थना केली होती. श्री बालाजीच्याच कृपेने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा कार्यक्रम यथासांग व्यवस्थित आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. याविषयीची कृतज्ञता म्हणून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १ ऑगस्ट या दिवशी श्री बालाजीच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, आगामी आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी श्री बालाजीच्या चरणी प्रार्थना केली.
श्री बालाजीच्या चरणी निमंत्रणपत्रिका अर्पण करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आलेली अनुभूती![]() मे मासामध्ये मी श्री बालाजीच्या चरणी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रणपत्रिका चरणी ठेवण्यासाठी गेले होते. त्या वेळी महोत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेवर श्री बालाजीची दृष्टी पडावी, अशा पद्धतीने मूर्तीसमोर प्रत्यक्ष धरली. त्या वेळी मला ‘क्षणभर श्री बालाजीची पापणी हलतांना जाणवली आणि मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवला अन् देवाने माझे म्हणणे ऐकले’, असे जाणवले. तिरुपती मंदिराच्या परिसरातच श्री बालाजीची आई श्री बकुळादेवी हिचेही मंदिर आहे. मी त्या ठिकाणीही महोत्सवाची निमंत्रणपत्रिका चरणी ठेवली. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, कोणताही मुलगा आईचे ऐकतो. या भावाने मी डोळेबंद करून श्री बकुळादेवीला प्रार्थना केली, ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ निर्विघ्नपणे पार पडू दे आणि आई तुझ्यासह श्री बालाजी असे दोघांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे.’ ही प्रार्थना करतेवेळी डोळे बंद असतांना ‘देवीचा हिरव्या साडीचा पदर निमंत्रणपत्रिकेवर पांघरला गेला. तिने आम्हाला आशीर्वादाच्या मायेची ऊब दिली’, असे जाणवले. मी डोळे उघडले, तेव्हा देवीने हिरवी साडी नेसलेली होती, हे दिसले. यातून देवीने महोत्सव निर्विघ्न पार पडण्याविषयी आणि उपस्थित रहाण्याविषयी आशीर्वाद दिला, असे जाणवले. |

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक