डॉनल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात स्थलांतराची धोरणे झाली अधिक कठोर !
नवी देहली – डॉनल्ड ट्रम्प यांनी जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर स्थलांतरितांचे धोरण अत्यंत कठोर करण्यात आल्याने गेल्या ६ महिन्यांत भारतियांना मोठ्या प्रमाणात परत पाठवण्यात येत आहे. आकडेवारीचा विचार करता माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात प्रतिदिन साधारण ३ भारतियांना परत पाठवण्यात येत असे. आता हे प्रमाण ८ वर पोचले आहे. टक्केवारीचा विचार करता ही २६७ टक्क्यांची वाढ आहे.
🇺🇸✈️ Massive Spike in Deportations of Indians from the US!
📈 In just 6 months, the number of Indians deported from the US has increased by a staggering 267%!
👤 After Donald Trump took charge as US President in January 2025, immigration policies have become drastically… pic.twitter.com/M2J26yWvrM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 2, 2025
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,
१. जानेवारी २०२० ते जुलै २०२५ या साडेपाच वर्षांच्या कालावधीचा विचार करता एकूण ७ सहस्र २४४ भारतीय नागरिकांना विविध कारणांमुळे अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले. ट्रम्प यांच्या कार्यकाळाचा, म्हणजेच जानेवारी २०२५ पासूनचा विचार केला, तर ही संख्या १ सहस्र ७०३ आहे. ही संख्या एकूण साडेपाच वर्षांच्या संख्येच्या तुलनेत जवळपास २५ टक्के आहे.
२. राज्यनिहाय भारतात परत पाठवण्याची आकडेवारी पहाता पंजाब आणि हरियाणा या २ राज्यांतूनच अनुक्रमे ६२० आणि ६०४ भारतियांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले. यानंतर गुजरातचा क्रमांक लागतो. २५४ गुजरातींना अमेरिकेने परत पाठवले. गोव्यातील २६, तर महाराष्ट्रातील २० लोकांना गेल्या ६ महिन्यांत परत पाठवले गेले.

पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !