श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण

तिरुवल्ली (तमिळनाडू) : येथील तिरुत्तणि गावातील सुब्रमण्य स्वामी मंदिरातील कार्तिकेयाचे जीवनाडीपट्टी वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ३० जुलै या दिवशी दर्शन घेतले.

या वेळी भगवान कार्तिकेयाचे पूजन करण्यात आले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, आगामी आत्पकाळात साधकांचे रक्षण व्हावे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी प्रार्थना केली.

🙏 Visit to Subramanya Swamy Temple, Tiruttani – one of the six sacred abodes of Bhagwan Kartikeya in Tamil Nadu.
Shrichitshakti (Mrs) Anjali Mukul Gadgil, one of the two spiritual heirs of Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale founder of @SanatanSanstha & Nadi reader Pujya… pic.twitter.com/nnyyFssaaQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 2, 2025
तिरुत्तणि कार्तिकेय मंदिराचा स्थानमहिमा
तारकासुराच्या संहारानंतर शिवपार्वतीच्या आज्ञेने कार्तिकेय दक्षिणेत येतात. कार्तिकेय तारकासुराचा मोठा भाऊ असुर सूरपद्म याला तमिळनाडूतील तिरूचेंदूर या समुद्र ठिकाणी संहार करतात. आक्रोशात असलेले कार्तिकेय विश्रांतीसाठी ज्या पर्वतावर येतात, ते म्हणजे तिरुत्तणि पर्वत. कार्तिकेय या पर्वतावर येऊन वास करायला लागल्यावर शांत होतात. तिरु म्हणजे श्री आणि तणि म्हणजे शांत होणे. कार्तिकेयाने याच पर्वतावर अगस्ती ऋषि यांना तमिळ भाषा शिकवली.

कार्तिकेयाच्या देवसेना आणि वल्ली या २ पत्नी आहेत. तारकासुराच्या संहारानंतर संतुष्ट झालेल्या इंद्राने त्याची मुलगी देवसेना कार्तिकेयाला दिली आणि कैलासात त्यांचा विवाह झाला. सूरपद्म असुराच्या संहारानंतर कार्तिकेय तिरुत्तणिला आला. येथे त्याने भक्त असलेल्या वल्ली नावाच्या भिल्ल मुलीशी विवाह केला. तमिळनाडूत हा दैवी विवाह, म्हणजे ‘जीव आणि शिवाचे मिलन’, असे मानले जाते. तिरुत्तणि कार्तिकेय मंदिरात वल्ली आणि कार्तिकेय यांचा विवाह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
तिरुत्तणि कार्तिकेयाचे मंदिर कांचीपूरमपासून ४५ किलोमीटरवर आणि चेन्नईपासून ८० किलोमीटर दूर आहे. येथून तिरुपति ६० किलोमीटरवर आहे. एका छोट्याशा टेकडीवर असलेल्या या मंदिराला जायला ३६५ पायर्या आहेत, ज्या ३६५ दिवसांचे प्रतीक आहेत. कार्तिकेयाचे भक्त कावड घेऊन हे ३६५ पायर्या चढून देवाकडे जातात.
कार्तिकेयाची एकूण ६ महत्त्वाची स्थाने आहेत. विशेष म्हणजे ही ६ स्थाने दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात आहेत. कार्तिकेय हे तमिळनाडूचे इष्टदैवत आहे. या ६ प्रमुख कार्तिकेय स्थानांपैकी तिरुत्तणि ५ वे प्रमुख स्थान आहे.
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !