आजीची भाजी रानभाजी
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे. आज फोडशी या भाजीची माहिती येथे दिली आहे. (भाग ७)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/941022.html

भाजी करण्याची पद्धत

कार्ली, कुली, पेवा अशी याला स्थानिक नावे आहेत. भाजी धुऊन बारीक चिरून घ्यावी. भाजीचा हिरवा आणि पांढरा दोन्ही भाग यामध्ये घ्यायचा आहे. कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालावे. मिरची आणि लसूण घालून १ मिनिट ती परतावी. त्यानंतर चिरलेला कांदा घालून २-३ मिनिटे परतल्यानंतर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून शिजवा. भाजी अगदी सुकी वाटली, तर थोडे पाणी शिंपडा. आवश्यकतेनुसार साखर, मीठ, नारळ घालून एकत्र करा. पुन्हा २ मिनिटे शिजवावी. तयार भाजी, पोळी, भाकरी, भातासमवेत वाढून घ्या.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/941815.html
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !