आजीची भाजी रानभाजी
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे. आज ‘अळू’ या रानभाजीची माहिती येथे दिली आहे. (भाग ८)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/941507.html

अळूची भाजी करण्याची पद्धत

अळू ही तशी सर्व घरांत प्रसिद्ध असणारी भाजी आहे. अळूच्या वड्या या सर्वांना विशेष स्वाद देऊन जातात. शेंगदाणे, चणाडाळ किमान २ घंटे पाण्यात भिजत घालावी. नंतर कुकरमध्ये १ किंवा २ शिट्या घेऊन शिजवून घ्यावे. अळूची पाने धुऊन पुसून घ्यावीत. देठे वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. देठांसह पाने बारीक चिरून घ्यावीत. कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. त्यामध्ये चिरलेला अळू घालावा. चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. चिंचेचा कोळ घालून पुन्हा ३ ते ४ मिनिटे शिजू द्यावे. पाण्यामध्ये बेसनचे केलेले मिश्रण कढईत घालून ढवळावे. त्यानंतर शिजवलेली चणाडाळ आणि शेंगदाणे घालावेत. आवश्यकतेनुसार पाणी, गोडा मसाला, गूळ घालावा. एक चांगली उकळी काढून भाकरी, गरमागरम तूप-भातासमवेत तिचा आस्वाद घ्यावा.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/942553.html
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !