(‘अँटिऑक्सिडंट’ म्हणजे ऑक्सिडीकरण रोधक होय. हे शरिरातील पेशींचे संरक्षण करतात आणि त्यांना होणारी हानी न्यून करतात.)
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे. आज अळंबीची माहिती येथे दिली आहे.
(भाग ६)
१. अळंबी
अरण्यऋषि दिवंगत मारुति चित्तमपल्ली यांच्या ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकातील ‘जंगलातील वनस्पती शास्त्रज्ञ’ या लेखात अस्वलांचा वावर ओळखतांना अळंबीचा उल्लेख येतो. पावसाळ्यात विपुल प्रमाणात जंगलात वाढणार्या िबनविषारी अळंबी ओळखून अस्वल खातात. खाण्यापेक्षा कित्येकदा अधिक नासधूस करतात. हे करतांना खाल्लेल्या अळंबीचे अवशेष जागेवर पडलेले असतात. त्यापासूनच बिनविषारी अळंबी आदिवासी ओळखायला शिकले ते अस्वलापासून. अळंबीमध्ये अँटिऑक्सिडंट, प्रथिने, डी जीवनसत्त्व, सेलेनियम आणि झिंक असते. प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगामध्ये ते गुणकारी असते.
अळंबी उकळून प्रतिदिन न्याहारीला खाल्ल्यास वजन न्यून होण्यास साहाय्य होते. मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रित राखण्यासाठी अळंबीचा उपयोग होतो. यातील सेलेनियममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदय रोगासाठी याचे सेवन उपयुक्त आहे. गॅस, अपचन, पोटदुखी यांसारख्या आजारात गुणकारी आहे.

अ. अळंबी विषारी कि बिनविषारी कसे ओळखावे ? : कळी असणार्या अळंबी पाण्याने स्वच्छ धुऊन आणि पुसून घ्यावी. हळद आणि मिठाच्या पाण्यात अर्धा घंटा बुडवून ठेवावी. पाण्याचा रंग लाल झाला, तर ती विषारी आहे, असे समजावे. रंग तसाच पिवळा राहिल्यास ती खाण्यास उपयुक्त समजावे.
आ. भाजी करण्याची पद्धत : अळंबी कापून घ्यावीत. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्यावा. मसूर घालून चांगली परतून घ्यावी आणि एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर मसाला घालून परतावा आणि अळंबी घालावी. चवीनुसार मीठ, कोकम घालून वाफ काढून घ्यावी. त्यानंतर ओल्या नारळाचे वाटण आणि पाणी घालावे. मसूर शिजल्यानंतर खाण्यासाठी वाढून घ्यावे.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/941507.html

Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !